पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४५) शंकररूपाने एकदम प्रकट होऊन कृपादृष्टीने सर्वत्रांस अबलोकन करूं लागले. सर्वत्र सुरवर व भक्तवृंदांनी आपापलीं शिरकमले त्या दिव्य श्रीभगवान् शंकरचरणी नम्र केली. हास्यमुखानें सर्व- त्रांस आशीर्वाद देऊन श्रीशंकर कैलासास गेले. विद्यल्लतेचा प्रकाश त्यावेळी चहूंकडे चमकला, व सर्व देव तेथेच अंतर्धान पावले. पूर्ण आत्मज्ञानी असे थोर महात्मे, व एकनिष्ठ शिप्य जे तेथे होते, ते मुक्तकंठानें श्रीशंकराचार्यांच्या नावाचा दीर्घकाल जयनाद करीत, व स्तुतिगान करीत, आचार्यांच्या प्रसादपादुका मस्तकी धारण करून, नृत्य करीत स्वकार्याप्रीत्यर्थ स्वस्थानाप्रत निघून गेले. ॥ शुभंभवतु ॥ श्रीमज्जगद्गुरु श्रीशंकराचार्यमहाराज की जय. पद्यमय आचार्य-चरित्र.. (चाल-चंद्रकांत राजाची कन्या.) जगला वैदिक धर्म सनातन ज्या मुनिच्या सुयशें गातो तयश भक्ति सुधारस कलिमल जै नासे । बौद्ध जैन पाखंड मताने सनातनी भ्रमले नेता नाही म्हणुनी फसले स्वत्वासी मुकले यदायदा धर्मासी ग्लानी येइल त्या समयीं घेई मी अवतार अर्जुना, तिमिर दूर जाई भगवद्वचना सार्थ कराया भारतवर्षांत द्वैतवाद तो दूर कराया अवतरले कलिंत केरळ प्रांती कालटि ग्रामी विमल विप्रसदनीं शुद्ध पंचमी वैशाखांतिल उच्च लग्न सुदिनी