पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४४ ) आचार्यांवर वृष्टि केली. सर्वत्र आनंदोर्मी उसळल्या. भक्तजन प्रेमाने नृत्य करू लागले. आचार्य स्वतःच्या मताचे श्रेष्ठत्व सिद्ध व्हावें या करतांच जगद्वंद्य पीठावर बसले, मान्यतेकरतां बसले नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.द्वारका, जगन्नाथ, शंगेरी, व बदरीकेदार या पीठांवर सुरेश्वरादि मुख चार शिष्यांस बसवून आचार्य बद्रिकाश्रमी आपल्या शिष्यवर्गाला भाष्याचा उपदेश करीत राहिले. कलिकल्मधाचा नाश करणाऱ्या, व अद्वैत ज्ञानाचा चिरकाल कीर्तिपरिमल टिकविणाऱ्या अशा महाभाग थोर सत्पुरु- षाची बत्तीस वर्षे पूर्ण होत आली. इच्छिलेले स्वकार्य पूर्णपणे शेवटास गेलेले पाहून व आतां कांहीं कार्य राहिले नाही, या आनंदाने आचार्य ब्रह्मसुखांत निमग्न झाले. बदरीकेदारास शिष्यवगास फार थंडीची पीडा होऊ लागल्याने आचार्यानीं श्रीशंकरांची प्रार्थना करून तेथे एक तप्तोदकाची नदी उत्पन्न केली ती अद्याप तेथे आहे. पूर्वसंकेतानुरूप आचार्याचे देवकार्य संपल्यावर त्यांना नेण्याकरतां ब्रह्मदेव इंद्रादिदेवांसह तेथे आले. कल्प- वृक्षाच्या पुष्पांनी सुरवरांनी आचार्याची मनोभावाने पूजा केली, व परम करुणेने त्यांचे स्तवन केलें. आपण ज्या कार्यासाठी पृथ्वी- वर आलांत तें कार्य यशस्वी झालें, सर्व जनता ज्ञान उन्मुख करणे पूर्ण झाले. तरी आतां आमचे प्रिय करण्याकरता आपण स्वस्थानी कैलासी चलावें. ही प्रार्थना संपतांच विमल शुभ्रवर्ण असा नंदि- केश्वर पुढे येऊन उभा राहिला. तेव्हां इंद्रादि देवांनी स्तुति केलेलें स्वर्गीय पुष्पमालांनी शोभित झालेले, त्रिभुवनांत विजयश्रीने गाज- लेले व ब्रह्मदेवाने ज्यांचा लीनतेने हात धरला आहे असे भगवत् पूज्यपाद आद्य श्रीशंकराचार्य नंदीवर आरूढ झाले, व स्वरूपाचे यथार्थ ज्ञान भक्तांस व्हावें, सर्वत्रांस दर्शन द्यावे, एतदर्थ श्री-