पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४३) प्रवर्तक, अद्वैतवादी व सर्वज्ञ असे आचार्य येत आहेत. तर हे दुर्मत्सरी वादप्रवर्तकांनों, दूर सरा ' असा लोकध्वनी चहूंकडून निघू लागला. आचार्य पुढे होऊन दक्षिणद्वार उघडणार इतक्यांत नानाप्रकारचे वादी त्यांना तेथेही आडवे आले. कणाद, गौतम, नैय्यायिक, कापालिक, बौद्ध, दिगंबर, जैमिनीयआदि हटवादी पंडितांनी आचार्याशी दीर्घकालपर्यंत वाद केला. परंतु आचार्यानी सप्रमाण त्या सर्वाचे पूर्ण खंडन केले. वादांत हरल्यावर सर्व पंडित शरण आले आणि त्यांनी स्वतः पुढे होऊन मंदिराचे दक्षिणद्वार उघडून आचार्यास आंत जाण्यास नम्रतेने विज्ञप्ति करून मार्ग दिला. आचार्य मांदिरांत जाऊन सिंहासनावर बसणार इत- क्यांत शारदा देवी आकाशवाणीने म्हणाली, हे मुने, तूं सर्वज्ञ आहेस याबद्दल मला संशय नाही. कारण बाहेर जो अनेक मतांच्या पंडितांशी तुझा वादविवाद झाला त्यांत तूं विजयी झाला आहेस. हेच तुझ्या सर्वज्ञतेचे लक्षण आहे; पण माझ्या पीठावर आरूढ होणारा सर्वज्ञ स्वतः निर्मल आचरणाचाही हवा व त्याची मला परीक्षा केली पाहिजे. तर तूं सिंहासनावर बसण्याचे साहस करूं नकोस. कारण परकायप्रवेश करून तूं विषयोपभोग घेतला आहेस. म्हणून तू येथे बसण्यास योग्य नाहीस. आचार्य म्हणतात, महत्वाचे कार्याकरतां मी परकायप्रवेश केला हे तुमचे म्हणणे खरे आहे. पण त्याचा या देहाशी काय संबंध ? एकदा आत्म्याने देहाविषयींचे संपूर्णममत्व टाकलें म्हणजे त्या देहांत घडणाऱ्या कर्माचा लेप त्या आत्म्यास लागत नाही. हे तर मान्य झालेले लोकप्रसिद्ध असें तत्त्व आहे.इत्यादि प्रकारें देवीवाक्याचे समा- धान करून श्रीशंकराचार्य त्या सिंहासनावर बसले,तेव्हां आचार्याच्या नांवाचा चहूंकडून जयजयकार झाला. सुरवरांनी स्वर्गीय पुष्पांनी