पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४२) तथास्तु, ठिकाणी प्राप्त झाले. आचार्यानीं भक्तिपूर्वक त्यांचे स्वागत केले.तेव्हां गौडपादमुनी म्हणाले, तू गोविंदयतीपासून सर्व विद्या शिकलास काय? कांहीं आनंदरूप तत्त्व जाणतोस काय ? व शिष्यवर्ग भक्तिभावाने तुझी सेवा करतात का? त्यावर आचार्य म्हणाले, आपल्या कृपा- दृष्टीने आमचे सर्वत्र कल्याण होईल,आपल्या कृपेने आम्हांस काय दुर्लभ आहे ! नंतर गौडपादांच्या कारिकावरचें आचार्यांनी केलेले भाप्य त्यांनी गौडपादास दाखविले. ते पाहून गौडपाद फारच संतुष्ट झाले व त्यांनी वर मागण्यास सांगितल, आचार्य प्रार्थना करतात, आपल्यापासून दुसरा कोणाचा वर मागावयाचा आहे ? मला सतत आत्मचिंतन घडो हेच वरदान द्या. असें म्हणून गौडपादमुनि अंतर्धान पावले. गंगातीरावर प्रातः- कर्म करीत असतां आचार्यास पुढील वर्तमान समजले. काश्मीर प्रांतांत एक शारदेचे मंदीर आहे. त्या देवळांस चार दिशेला चार द्वारे आहेत. आंत एक सिंहासन आहे. उत्तम पंडितांतील जो कोणी त्या सिंहासनावर बसतो तो सर्वज्ञ होतो. पूर्व, पश्चिम व उत्तर या दिशांकडचे दरवाजे उघडून व आंतील सिंहासनावर बसून त्या त्या दिशेकडचे लोक सर्वज्ञ झाले आहेत. दक्षिणेकडचा कोणीही पंडित येत नाही व दरवाजा उधहून सर्वज्ञ होत नाही; किंवा दक्षिण दिशेकडचे लोक सर्वज्ञतेस पात्र होण्यास लायक दिसत नाहीत; त्यामुळे मंदिराचे दक्षिणद्वार कायमच बंद झाल्या- सारखे आहे. हे वृत्त समजतांच आचार्य शिष्यांस बरोबर घेऊन काश्मीरकडे जाण्यास प्रवृत्त झाले. काही दिवसांनी आचार्य इष्ट स्थळी येऊन पोहोचले. वाटेने येतांना आचार्याच्या कीर्तिपरि- मलाचा लोकांकडून अनुवाद होत होता. शारदा मंदिराजवळ आचार्य येताच ' सर्व वाद्यांचे खंडन करणारे, वेदांत सांप्रदाय