पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४१) होऊ लागल्या. शिप्यांना गुरुजींची ही कष्टप्रद स्थिति पाहवेना, व आचार्य औषधही घेईनात. आचार्य शिप्यास सांगतात, मला औषध देऊ नका. या रोगाचा क्षय भोगानेच होईल. या रोगाने देह जरी पडला तरी पळू द्या. शिष्यांनी फारच आग्रह केल्यावर एका वैद्याचे औषध सुरूं केले परंतु रोग हटेना. शेवटी कंटाळून वैद्य निघून गेला. रोग रोजच्या रोज वाढीस लागल्याने अत्यंत कष्ट होऊ लागले. तेव्हां शिप्यांच्या समजुतीकरतां आचार्यानी श्रीशंकराची प्रार्थना केली. श्रीशंकराच्या आज्ञेने दोन ब्राह्मणांच्या रूपाने अश्विनीकुमार आचार्याकडे आले, व त्यांनी रोगाची चिकित्सा केली. ते म्हणाले, हा रोग कोणा तरी मांत्रिकानें आचार्यास अपाय व्हावा म्हणून जारणमारणादि कृतीने मुद्दाम उत्पन्न केला आहे. त्याचा प्रतिकार मंत्रानेच होईल, इतर उपायाने तो रोग कदापि बरा होणार नाही. इतकें सांगून ते ब्राम्हण निघून गेले. ही हकीकत ऐकतांच पद्मपादमुनि मनस्वी संतापले, व आचार्य त्यांचे निवारण करीत असताही ते रोग- निवारणार्थ मंत्र जपण्यास बसले. काही दिवसांनी मंत्र सिद्ध होऊन रोग संपूर्ण बरा झाला. आचार्य पूर्वीसारखे हिंडूं फिरूं लागले. इकडे त्या मंत्राचा प्रभाव असा झाला की, तो रोग जो उलटला तो अभिनवगुप्तास तीक्ष्ण स्वरूपाने उत्पन्न झाला. त्या रोगाची भयंकर पीडा होऊन अभिनव गुप्त शेवटी पंचत्व पावला. परद्वेषानें चिडलेल्या अभिनव गुप्ताने आचार्यांच्या नाशाकरतां व्यूह रचला; पण परमेश्वर सत्याचा वाली असल्याने, या विपरीत कर्मात अभिनव गुप्तास अखर प्राणास मुकावे लागले. एकदां सायंकाळी आचार्य गंगाकांठी ब्रम्हचिंतन करीत होते. इतक्यांत त्यांचे परात्पर गुरु जे गौडपादमुनि ते अकस्मात् त्या