पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४०) " गेले. आचार्यानी ज्या ज्या वाद्यांशी वाद करून त्यांना जिंकले ती मतें साधारणपणे पुढीलप्रमाणे आहेत. ( अनेकविध मतांची वाचकांस कल्पना व्हावी एतदर्थ ही यादी देत आहे.) शैवमत शिवमतैकदेशिकमत, भागवतमत, वैष्णवमत, पांचरात्रमत, बैखा- नसमत, कर्महीनवैष्णवमत, हैरण्यगर्भमत, सौरमत, अग्निवादीमत; महागणपतिमत, हरिद्रा गणपतिमत, उच्छिष्ट गणपतिमत, नव- नति स्वर्ण संतान गणपतिमत, शक्तिमत, महालक्ष्मीमत, वाग्दे- बतागत, वामाचारमत, कापालिकमत, कापालिकैकदेशिमत, चार्वाकमत, सौगतमत, जैनमत, बौद्धमत, मल्लारिमत, विष्वक्सेन- मत, मन्मथमत, कुवेरमत, इंद्रमत, यममत, वरुणादिमत, शून्य - मत, वराहमत, लोकमत, गुणमत, सांख्यमत, कापिलमत, पीलु- वादिमत, कर्ममत, चंद्रमत, राहुमत, क्षपणकमत, पितृमत, शेष गरुडमत, सिद्धमत, गंधर्वमत, भूतवेतालमत. अशा प्रकारच्या पर- स्परविरुद्ध मूळ सनातन संस्कृतीच्या तत्त्वास विधातक अशा प्रत्येक मताच्या मुख्य पंडिताशी वाद होऊन ते सर्व लोक जिंकले गेले. व त्या सर्व मताचे लोक आपल्या पूर्वीच्या सनातन वैदिक अद्वैत मतास येऊन मिळाले. अखिल भारतवर्षांतील अद्वैत मताविरुद्ध असणाऱ्या अनेक मतांचा संपूर्ण पाडाव करून आचार्य दिग्वि- जयी झाले. भारतवर्षात दुरभिमानाने पसरलेल्या अनेक मतांचा निःशेष पराजय होऊन श्रीशंकराचार्यांचा यशोदुंदुभी उज्वलतेने व सर्व श्रेष्ठत्वाने निनादित झाला. पूर्वी आचार्यांनी अभिनव गुप्तवाद्यास जिंकले होते. तो रोष मनांत धरून आचार्यास पीडा व्हावी, येवढ्याकरतां अभिनव गुप्ताने अभिचारिक मंत्रतंत्राने प्रयोग केला. त्यायोगानें आचार्यास भगंदर रोग उत्पन्न झाला. त्यापासून आचार्यास फारच यातना