पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३९) झाल्यावर आचार्यानी त्याने केलेली तीन नाटके अजून आहेत का अशी पृच्छा केली. तेव्हां दीनवदनाने राजानें, अग्नीमध्ये ती तीनही नाटके जळून गेल्याने माझे सर्व परिश्रम व्यर्थ गेले असे सांगितले. आचार्यांनी राजशेखरास पूर्वस्मृति देऊन त्याजकडून ती नाटके पुनः लिहविली. राजा परत जावयास निघाला, तेव्हां आचार्य त्यांस सांगतात, कालटी प्रामांतील, ब्राह्मण वैदिक कीस अपवित्र होतील, असा मी निग्रह केला आहे त्याचे तूं पालन कर. ते ऐकल्यावर आचार्यांजवळून पर- ब्रह्माचा उपदेश घेऊन राजशेखर नृपति आनंदप्रचुर अशा आपल्या राजधानीस परत आला. प्रकरण आठवें हजारों शिष्यांसह आचार्य सुधन्वा राजास बरोबर घेऊन आपल्या अद्वैत मताचा आखिल भरतखंडांत प्रसार करण्याकरितां निघाले. स्वतःचे श्रुतिन्यायसिद्ध असें अद्वैत मत प्रस्थापित करतांना पूर्वपक्षाशी वादविवाद करावा लागे. वादांत पूर्वपक्ष हरला म्हणजे मग तो आचार्याचे अद्वैतमत स्वीकारी. त्यावेळी भरतखंडांत असंख्य मते व हजारों पंथ उत्पन्न झाले होते. निश्चित मताच्या अभावीं जनताही सर्व मतांकडे साशंकपणे पाही. काही लोक आचार्याचे मत स्वीकारून त्यांना शरण आले. परंतु कांहीं दुरभिमानी वादी आपल्या पांडित्याच्या जोरावर अत्यंत गर्विष्ट झाले होते. व आपल्या विद्वत्तेपुढें आचार्य खास हार जाणार अशी त्यांची समजूत होती. परंतु प्रत्यक्ष वादाचे वळी त्यांना उलटा अनुभव येऊन सर्व वादी लोक पूर्णपणे जिंकले