पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३८) होता ) तेव्हां त्यास हे कृत्य सहन झाले नाही. पण वरकरणी त्याने उत्तम टीका आहे असे दर्शविले. पद्मपादांनी ते भाष्य मी रामेश्वराहून परत येईपर्यंत नीट जतन करा, असे सांगून रामेश्वराकडे गमन केले. परद्वेषाने दूषित झालेल्या त्या मामाने पद्मपादाची ती पोथी एका घरांत ठेवून घरास आग लाविली व आपण दुसऱ्या घरांत राहावयास गेला.(मामाला घर जाळण्याचे कारण की, घरास एकाएकी अग्नि लागला व त्यांत पोथी जळाली हे लोकांस व पद्मपादास भासविण्याकरिता त्याने त्या पोथीकरतां घर जाळले. ) विघ्नसंतोषी लोक स्वतःचे नाक कापून नुकसान करून घेऊन दुसऱ्यास अपशकून कसा करतात तें या गोष्टी- वरून चांगले लक्षांत घेईल. ) यात्रेहून पद्मपाद आल्यावर त्यांस हा वृत्तांत समजला. त्यामुळे त्यांस फार वाईट वाटले. मामा पद्मपादास सांगतो, दुर्दैवाने घरास आग लागली त्यांत तुझी पोथी जळाली. घराच्या नुकसानीपेक्षा मला तुझी पोथी नष्ट झाली याबद्दल फार वाईट वाटते. परंतु झाल्या गोष्टीस इलाज काय ? तेव्हां पद्मपाद म्हणतो, मामा, शोक करण्याचे कारण नाही. पोथी जरी नाहीशी झाली तरी माझी बुद्धि जिवंत आहे. मी पुन्हां ग्रंथ तयार करीन. हे ऐकल्यावर काही दिवसांनी त्या दुष्टबुद्धी मामाने भाच्यास बुद्धिमांद्यत्व यावें एतदर्थ काही औषधी पदा- र्थात कपटाने घालून भाच्यास ते पदार्थ खाऊ घातले. त्यामुळे पद्मपादांस बुद्धिभ्रम झाला तरी तो त्या भ्रमांतच तसाच आचार्यांचे जवळ आला. हा विपरित प्रकार पाहून आचार्यानी कृपादृष्टीने त्यांचा भ्रम दूर केला व त्यांचे सांत्वन केलें. पद्मपादांनी गुरुकृपे- च्या योगाने पुनश्च पंचपादिका तयार केली. पूर्वी सांगितलेला राजशेखर नृपति एकदां आचार्यांच्या भेटीस आला. कुशलप्रश्न