पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७) आनंदगिरी वगैरे शिष्यांना बोलावून स्वतंत्रा अद्वैतपर असा ग्रंथ लिहिण्याची आचार्यानी त्यास आज्ञा दिली. आचार्य काही दिवस शंगेरीस राहून आपल्या मातोश्रीस भेटण्या- करितां ते कालटी येथे आले. त्रिभुवन विजयी झालेला मुलगा आलेला पाहतांच आयर्याबेस परम आनंद वाटला. ती फार वृद्ध झाल्याने तिचा अंतकाल समीप आला होता. ती आचार्यास म्हणते, हे बाळा, जरेनें जीर्ण झालेले हे शरीर मला आतां सहन होत नाही. तेव्हां शास्त्रविहित मार्गाने याचा संस्कार करून मला पुण्यलोकास पोंचीव. आईची ती आसन्नमरण स्थिति अव. लोकन करून आचार्यानी तिला उपदेश केला. शेवटी आर्याबा हैं नश्वर कलेवर सोडून गेली. तिचा आत्मा आचार्यांच्या तपः- सामर्थ्याच्या योगाने शाश्वत निर्मल अशा वैकुंठाप्रत प्राप्त झाला. मातेच्या अंत्य संस्काराकरतां आचार्यानी आपल्या सर्व बांध- वांस बोलाविलें. तेव्हां ते म्हणाले, हे मुने, तुम्ही संन्यासी अस- ल्याने तुम्हांला हे और्ध्वदेहिक करण्याचा अधिकार नाही. शेवटी बांधव येत नाहीत असे पाहून आचार्यांनी स्वतःच सर्व योग्य विधी केला व ते आपल्या मातृऋणांतून मुक्त झाले. ज्ञातीचे लोक न आल्यामुळे या गांवांतील ब्राह्मण वेदकार्यास अपात्र होतील, व शास्त्रीय मर्यादेचे येथील ब्राम्हणांनी उल्लंघन केल्या- मुळे येथे संन्यासी भिक्षा घेणार नाही, असा निग्रह त्यांनी सांगि- तला, त्या आचार्यांच्या वाक्याचा प्रभाव अजून तेथें दृष्टोत्पत्तीस येत आहे. पद्मपादमुनि यात्रा करीत रामेश्वराकडे जातांना मध्येच आपल्या मामाकडे आले. आचार्यांच्या भाष्यावर लिहिलेली टीका त्याने आपल्या मामांस दाखविली. ( मामा प्रभाकर मतानुयायी, कर्मठ