पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६) विण्याकरितां आचार्यानी मनानेच गिरीला चतुर्दश विद्येचा उप- देश केला. गिरी नदीवरून परत आल्याबरोबर गुरुकृपेच्या योगानें वेदांचा गूढ व रम्य अर्थ विद्यार्थिजनांस सांगू लागला. त्याचें तें अलौकिक ज्ञान पाहून पद्मपादमुनींचा गर्व नष्ट झाला. गिरीने तोटक वृत्तांत सांगून आचायांची अतीशय सुंदर स्तुती केली.त्यामुळे आचार्यानी त्याचे तोटक असें नांव ठेविले. पद्मपाद, हस्तामलक, सुरेश्वर, व तोटक या एकापेक्षा एक विद्वान् अशा शिष्यांस पाहून हे धर्मार्थकाममोक्षरूप चार पुरुषार्थ आहेत, कां ऋग्वेदादि चार वेद आहेत; किंवा सालोक्य, सामीप्य, सारूप्य व सायुज्य असे हे मुक्तीचे चार भेद आहेत, अथवा ब्रह्मदेवाची चार मुखें आहेत, इत्यादि विविध विचार- तरंग अनेक पंडितांच्या अंतःकरणांत उठू लागले. सर्व शिप्यांना ग्रंथ करण्यास पुढीलप्रमाणे आचार्यानी आज्ञा केली. पद्मपादाने माझ्या भाप्यावर एक निबंध करावा, हस्तामलकानें वार्तिकें करा- वींत व सुरेश्वराने स्वतंत्र असा एक आत्मज्ञानप्रचुर ग्रंथ लिहावा. आचार्यांनी सांगितल्यावर सुरेश्वराने नैष्कर्म्य सिद्धीचा ग्रंथ तयार केला. त्यामुळे आचार्यास फार समाधान वाटलें. तैत्तरीय व वृहदारण्यक या दोन उपनिषदांवर सुरेश्वरांनी वार्तिकं केली. ती त्याने आचार्यास अर्पण केली. पद्मपादांनीं भाष्यावर टीका लिहिली. त्यांतील पहिल्या भागास पंचपादिका, व दुसऱ्या भागास वृत्ति असे म्हणतात. तसेंच व्याससूत्रावर विजयडिंडिम नांवाची टीका लिहून गुरुदक्षिणा म्हणून त्याने ती आचार्यास अर्पण केली. आचार्य सुरेश्वरास म्हणतात की, तूं वाचस्पति- रूपाने पुनः या पृथ्वीवर अवतीर्ण होऊन माझ्या भाप्यावर उत्तम टीका करशील. ती टीका प्रलयकालपर्यंत निःसंशय टिकेल.