पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५) ब्राह्मण अतिशय धनसंपन्न होता. पण मुलगा मुका असल्याने तो सदा उदासीन असे. त्याने आपला मुका पुल आचार्यास दाख- विला. आचार्य त्या मुक्या मुलास म्हणाले, तू असा मुक्यासारखा कां वागतोस? त्यावर तो आतापर्यंत मुका असलेला मुलगा एक- दम बोलू लागला. मी जड नसून सर्व जड पदार्थाची प्रवृत्ति माझ्या- मुळे होते. मी सुखस्वरूप परब्रम्ह आहे, जड नाही. इत्यादि तत्त्वार्थयुक्त भाषा तो मुलगा सहजस्फूर्तीने बोलू लागला. या- वरून आचार्यानी त्याचे हस्तामलक असे नांव ठेविलें, व ते प्रभा- कर ब्राह्मणास म्हणतात, हा मुलगा तुमच्याजवळ राहण्यास योग्य नाही. हा अत्यंत विद्वान् असल्याने याचा उपयोग जगाच्या उद्धा- रार्थ होईल. तरी मी यास घेऊन जातो. प्रभाकराने संमति देतांच त्या मुलास घेऊन आचार्य तेथून निघाले. अजूनही ज्यावर ऋष्यशृंग तपश्चर्या करीत आहे, व जेथे तुंग- भद्रा नदी वाहत आहे, त्या शृंगगिरी ( शृंगेरी) पर्वतावर आचार्य आले. आचार्यांनी तेथील लोकांस भाप्यादि ग्रंथ शिक- विले. विद्यापीठाकरितां तेथें शंकर मठाची स्थापना करून श्रीशार- देचे मंदीर बांधन मठांत सर्व विद्याप्रवीण अशा सुरेश्वराची (मंडन- मिश्राची) स्थापना केली. गिरी नांवाचा अल्पज्ञानी पण गुरु- सेवापरायण असा एक भाविक ब्राह्मण विनयाने आचार्याचे समोर पाठाचे वेळी बसत असे. तो एकदां गुरुजींची छाटी धुण्यास नदी- वर गेला. इतक्यांत पाठाची वेळ झाली. सर्व विद्यार्थी येऊन बसले पण गिरी आला नाही, म्हणून आचार्य पाठ देण्यास जरा थांबले. तेव्हां पद्मपादमुनी म्हणाले, दगडासारखा जड व शास्त्रा- मध्ये अनधिकारी अशा गिरीची मार्गप्रतीक्षा करणे व्यर्थ आहे. असे पद्मपादांचे गर्वोक्तीचे वाक्य ऐकतांच त्याचा गर्व घाल-