पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४) तूं आपलें कार्य साधून घे. कापालिक नंतर आचार्यांच्या पाळतीवर राहिला. मध्यरात्री आचार्य ध्यानस्थ होते. जवळ आजूबाजूस कोणी नाही असे पाहून तो कापालिक त्रिशूळ घेऊन आचा- यांच्या अंगावर चालून जाणार, इतक्यांत, पद्मपादांनी ज्ञानचक्षूनें तो प्रकार अवलोकन करून लगेच उग्र सिंहरूप धारण केलें, व त्या कापालिकावर झडप घालून त्यास ठार मारिलें. आरडाओरडी- मुळे आचार्य जागृत झाले. तो पुढे त्यांस नृसिंहरूप दिसले. आचार्यांनी नृसिंहाची स्तुती केली. तेव्हां तो नृसिंह नाहीसा होऊन त्याचे ठिकाणी पद्मपादमुनी दिसू लागले. पद्मपादांनी झालेले वृत्त सांगून आचार्यास नमस्कार केला. आचार्य पुढे तीर्थयात्रा करीत गोकर्णास आले, ब देवाची पूजा- अर्चा केल्यावर ते मूकांबिका नांवाच्या स्त्रीचे घरीं उतरण्यास गेले. तिचा पति आपल्या मृत पुत्रास मांडीवर घेऊन शोक करीत होता. पुत्रवियोगाने मूकांबिकाही शोकविव्हल झाली होती. या करुण प्रसंगाने आचार्यांचे दया अंतःकरण कळवळले. इतक्यांत पुढील- प्रमाणे आकाशवाणी झाली ती अशीः-रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या लोकांची दया ही केवळ दुःखालाच कारण होते. हे वाक्य ऐकतांच आचार्य त्या मृत पुत्रास म्हणाले, ही अशरीरिणी वाणी सत्य आहे, तशी दया तुला एकट्यालाच शोभते, म्हणून तूंच या उभयतांच्या शोकांचा नाश कर. तोच ते बालक एकाएकी उठून बसलें; हा अद्भुत चमत्कार होतांच सर्वत्रांनी आचार्यांचा जय- जयकार केला. पुढे बली नांवाच्या गांवीं शिष्यासह आचार्य एकदां आले. तो गांव अत्यंत कर्मठ ब्राह्मणांच्या वास्तव्याने शोभत होता. तेथें अग्निहोत्रादि यज्ञकमै यथाशास्त्र होत होती. अप- मृत्यूची बाधा कोणासही होत नसे. प्रभाकर नावाचा एक विद्वान्