पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेस हे मी जाणतों. तरी आम्ही निर्माण केलेल्या क्षेत्रामध्ये तुझें सांनिध्य नित्य असावें. तथास्तु, असें म्हणून सरस्वती आकाश- मार्गे अंतर्धान पावली. नंतर मंडनमिश्राने आपले सर्वस्व ब्राह्म- णांस अर्पण केले, आणि श्रीशंकराचार्याकडून संन्यासदीक्षा घेतली. आचार्यांनी त्याला तत्वमस्यादि महावाक्यांचा उपदेश केला. तोच मंडनमिश्रपंडित पुढे सुरेश्वराचार्य या नावाने प्रसिद्ध झाला. प्रकरण सातवें एकदां जारणमारणादि विधेमध्ये प्रवीण असलेला भैरवाख्य नांवाचा एक कापालिक आचार्याकडे आला व म्हणाला, मी तपाच्या योगाने श्रीशंकरांस संतुष्ट केले. त्यामुळे शंकरांनी मला वर माग- ण्यास सांगितले. मी या स्थूल देहासह तुमच्या स्वरूपास प्राप्त होईन असे करा असें मी वरदान मागितले. तेव्हां श्रीशंकर म्हणाले, ' कोणा एका राजाचें अगर सर्वज्ञ अशा थोर विभूतीचे शीर घेऊन त्याचे हवन कर म्हणजे उद्दिष्ट साध्य होईल. ' त्या- प्रमाणे राजाचे शीर मिळण्याकरितां मी फार प्रयत्न केला, परंतु त्यांत यश आले नाही. आतां अनायासें तुम्ही भेटला आहांत, तर तुम्हीच माझं हे कार्य करा. तुम्ही सर्वज्ञ असून परोपकारा- प्रीत्यर्थच अवतार धारण गेला आहे. देह हा नश्वर असल्याचेही तुम्हांस माहीत आहे. परोपकाराप्रीत्यर्थ पुष्कळांनी आपले देह समर्पण केले आहेत. तरी तुम्ही आपले शीर मला द्या, म्हणजे तुमची कीर्ति होईल व माझेही कार्य शेवटास जाईल. आचार्य त्यास म्हणाले, ठीक आहे; परंतु माझे शिष्य माझें रक्षण करण्यांत फार दक्ष असतात. ज्यावेळी एकांतांत मी समाधीत असेन तेव्हां