पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२) झाले. गातांना परार्थगूढगर्भित गायनाने त्यांनी गुरुजीस पूर्व- स्मृति करून दिली. राजा गायनासक्त व विषयलोलुप पूर्णपणे बनला होता. तरी पण गायनाचा अर्थ लक्षात येतांच त्याची स्मृति जागृत होऊन आपण आपल्या कर्तव्यापासून च्युत झालों, म्हणून त्यांस वाईट वाटले. त्यामुळे राजास मूर्छा आली. हा प्रकार घड- तांच गायक मंडळी निघून गेली. इकडे राजसेवक रानोमाळ शव- शोधनार्थ हिंडतच होते, त्यांना गुहेमध्ये जतन केलेलें आचार्यांचे कलेवर सांपडले. महाप्रयासाने शिप्यांस बाजूस सारून त्यांनी तें शरीर स्वाधीन करून घेतले. विचारे गरीब शिष्य काय करतात राजशक्तीपुढे ! परंतु त्यांनी आपल्याकडून शिकस्त केली. सेवकांनी तें आचार्याचे शव चितेवर ठेविलें व अग्नि लाविला. इतक्यांत प्राण- रूपानें आचार्यानी त्या कलेवरांत प्रवेश केला. त्यामुळे ते शरीर चलनवलन करूं लागले. पद्मपादादि शिप्य हा प्रकार पाहातच उभे होते. त्यांनी झटकन् पाणी टाकून ती चिता विझविली; परंतु आचार्यांच्या शरीरास अभिदाहामुळे फारच पीडा होत होती.तेव्हां आचार्यांनी श्रीनसिंहाचें ध्यान करतांच त्यांचे शरीर पूर्वीपेक्षां सतेज होऊन त्यांच्या शरिराचा दाह शांत झाला. आचार्य शिष्यांसह निघाले ते मंडनमिश्राकडे आले. सरस्वतीने उत्तम प्रकारे त्यांचे स्वागत केलें, व पुढें वादविवाद न करतांच माझा पराजय झाला आहे असें तिने कबूल केलें. तुमच्यासारख्या देवस्वरूपी थोर विभूतीकडून आमचा पराभव होणे हे आम्हांस खात्रीने भूषणा- वहच आहे, असे म्हणून सरस्वतीने आचार्यांचा योग्य शब्दांत गौरव केला, व माझें कार्य संपलें, तर आतां मला जाण्यास आज्ञा द्या, अशी तिनें आचार्याजवळ प्रार्थना केली. आचार्य परवानगी देतांना सरस्वतीस म्हणाले, तूं प्रत्यक्ष वाग्देवता देवी सरस्वती