पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१) झाले नाही, तोपर्यंत माझें शरीर या गुहेत नीट जतन करून ठेवा.असें सांगून गुहेत देहाचे विसर्जन करून मृत झालेल्या अमरकराजाच्या कलेवरांत पायाच्या अंगुलीच्या द्वाराने आचार्यांनी योगबलाने प्राण- स्वरूपाने प्रवेश केला. एकाएकी अमरक राजा सजीव झाल्याचे दृश्य दृष्टीस पडतांच काही जणांस आनंद व काही लोकांस आश्चर्य वाटले. प्रधानादि सुज्ञ मंडळीस मात्र कोणातरी बलिष्ठ योग्याचा हा खेळ आहे असेंच वाटले. आपला देह कोठेतरी सुर- क्षित ठेवून या राजशरीरांत योग्याने आपला प्रवेश केला आहे अशी त्यांची कल्पना झाली. आपले इच्छित कार्य झाल्यावर हा योग्याचा आत्मा निघून जाणार व त्यामुळे अमरक राजा पुनश्च मृत होणार. तरी त्या आत्म्यास पुनरपि जातां येऊ नये असा बंदोबस्त केला पाहिजे. यास्तव प्रधानाने गुप्तपणाने दूतांस आज्ञा दिली की, जेथे जेथें मृत कलेवर तुम्हांस दिसेल, त्याचा तुम्ही तत्क्षणी नाश करा. या आज्ञेप्रमाणे सेवकांनी रानावनांतून, गिरि- कंदरांतून तपास सुरू केला. इकडे सजीव झालेला राजा सर्व प्रकारचे राजैश्चर्य व विषयसुखोप- भोग भोगू लागला. कामशास्त्रावर राजाने एकनिबंधही लिहिला. या गोष्टीस एक महिना झाला तरीः आपले गुरुजी परत येत नाहीत असे पाहून आचार्यांच्या शिष्यवृंदांस काळजी उत्पन्न झाली. आणखी पंधरा दिवस वाट पाहिल्यावर काही शिष्य गुरुजींचें शरीर रक्षण करण्यास राहिले व कांहीं आचार्याच्या शोधार्थ निघाले. तपास काढतांना पूर्वी मत झालेला परंतु आतां जिवंत होऊन राजैश्वर्यात गढून गेलेल्या अमरक राजाचे ठिकाणींच आचार्य असावेत असा शिष्यांनी तर्क केला. शिष्यांनी गवयाचे वेषाने राजदरबारांत प्रवेश केला, राजापुढे त्यांचे गायन सुरू , ..