पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०) > तांच सरस्वती म्हणते,मला असे वाटते की,माझ्या पतीचा पूर्ण परा- भव काही झाला नाही. कारण पतीचे अधैं अंग स्त्री हे आहे. तेव्हां मला जिंकल्याशिवाय तुम्ही विजयी झालात हे म्हणणे संभवत नाही. पुढें आचार्याचा व सरस्वतीचा सतरा दिवसपर्यंत सारखा वाद चालला होता. तोही अपूर्व असाच झाला. आचार्य हार जाण्याचे चिन्ह जेव्हां कांही दिसेना,तेव्हां सरस्वती विचार करते की,आचार्य शास्त्रविद्यंत माझ्यापुढे हार जाणे शक्य दिसत नाही. परंतु विवाह न करतां बालपणींच यांनी संन्यास केल्यामुळे यांच्यावर काम- शास्त्रांत मला विजय मिळविता येईल.या भावी विजयी भावनेने सर- स्वतीने पुन्हां निग्रहानें वादास प्रारंभ केला. सरस्वती म्हणते, मद- नाच्या किती कला आहेत, त्यांचे स्वरूप कसे आहे, त्या कामकला कशाचा आश्रय करून रहातात, लहानपणी त्यांची कशी स्थिति असते, स्त्री-पुरुषांच्या ठिकाणी मदनाची वेगवेगळी कशी अवस्था असते, वगैरे. या प्रश्नांची अनपेक्षित मालिका ऐकून आचार्य स्वगत विचार करतात की, या प्रश्नांची समर्पक उत्तरें जर दिली नाहीत, तर पराजय होणार व तोही एका स्त्रीकडून झाला हा कमीपणा येणार. बरें, उत्तरे द्यावी, तर ब्रह्मचर्यावस्थेत घेतलेल्या संन्यासधर्माचा क्षय होणार. ( असा विचार करतां सर्वज्ञ अशा व प्रत्यक्ष श्रीभगवान् शंकरच शंकराचार्य या रूपाने अवतीर्ण झाले असल्यामुळे त्यांना कोणचा विषय अगम्य होता? पण लौकिक व्यवहाराची अडचण दूर करण्याकरतां हा सर्व मानवी प्रकार करणे भाग पडले. )थोडासा विचार करून आचार्य म्हणतात, हे शारदे, मला एक महिन्याचा अवधि दे. म्हणजे मग मी तुला या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देईन. सरस्वतीने अनुमति देतांच आचार्य तेथून निघाले, व जातांना पद्म- पादादिक शिप्यांना ते म्हणाले, जोपर्यंत मला कामकलेचे ज्ञान प्राप्त