पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२९) . मिश्राने नानाप्रकारचे विकल्प केले. त्या विकल्पाचें आचार्यांनी निरनिराळ्या तर्कपद्धतीने योग्य प्रकारे खंडन केले. शेवटी आचा- यांच्या तर्कशुद्ध युक्तिवादाला अनुमोदन देऊन पंडित मंडनमिश्रानें. आचार्यास साष्टांग नमस्कार घातला. मंडनमिश्राच्या गळ्यांतील हार यावेळी सुकला होता. रोज वाद चालू असतां माध्यान्ह समयीं सरस्वती भोजनाकरतां मंडनमिश्रास भोजनास चला असें म्हणत असे व आचार्यास भिक्षेस चला, असे विनवी. यावेळी सरस्वती दोघांसही भिक्षेस चला असे म्हणाली. कारण यावेळी मंडनाचा पूर्ण पराभव झाला होता. सर्वत्रांचे भोजन झाल्यावर सरस्वती म्हणते, पूर्वी माझेकडून कांहीं अपराध झाला होता, त्यामुळे अति. कोपाने दुर्वासमुनींनी मला पृथ्वीवर मंडनमिश्र पंडितांच्या घरी तूं वास करशील असा शाप दिला. शापाची मुदत तुम्ही ज्यावेळी विजयी व्हाल तो समय सांगितला. तो सुदिन आज उगवला आहे. तरी मी आपली (आचार्याची) आज्ञा घेऊन स्वस्थानी जातें,. असें म्हणून सरस्वती जावयास निघाली. आचार्यानी अरण्यदुर्गा मंत्राने तिला थांबविलें, व ते तिला म्हणाले, मी तुला जाण्याची परवानगी देईन तेव्हां तूं जा. आपली जशी आज्ञा, असें म्हणून सरस्वती राहिली. पुनश्च मंडनमिश्र आचार्यास म्हणतो, वादामध्ये मी पराभूत झालो म्हणून मला तितकेंसें वाईट बाटत नाही. परंतु सर्वज्ञतेस पात्र असलेल्या जैमिनी मुनींच्या सूत्राचे खंडन झाले याबद्दल मला अती विषाद होत आहे. आचार्य म्हणतात, तुला जैमिनींच्या सूत्राचा अभिप्रायच कळला नाहीं असें वाटते. सर्व शंकांचे पुनश्च निरसन झाल्यावर मंडनमिश्र जैमिनी मुनींसच प्रत्यक्ष भेटून आला, व सर्वतोपरी विजयी झालेल्या आचा- यास तो अखर शरण गेला, व त्यांचा शिष्य झाला. हे वृत्त पाह- ,