पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७) 7 मंडन०-संन्यासवृत्तीचा विध्वंस करण्यास अवतरलेल्या मला, यतीचा भंग केल्यास काही दोष लागणार नाही. आचार्य०- संन्याशापासून झालेल्या पराजयांत कांहीं दोष नाही, हे तुझे म्हणणे बरोबर आहे. मंडन०-ब्रह्म कोणीकडे, व संन्यासवेष धारण करणारा हा कुबुद्धी कोणीकडे ? मिष्टान्न भोजनाकरतांच याने हा वेष घेतलेला दिसतो. काय हा कलियुगाचा महिमा! आचार्य-स्वर्ग कोठे, व हा कर्मठपणाचा दुराचार कोठे ? अग्निहोत्र म्हणजे काय, केवळ स्त्रियांचा उपभोग घेण्याकरतांच याने हा कर्मठाचा वेष घेतला आहे. काय हा कलियुगाचा महिमा ? याप्रमाणे त्यांचा वादविवाद चाललेला पाहून मध्येच श्री. व्यास म्हणतात, मंडना तूं जें या यतीला टाकून बोललास ते फार अनु- चित झाले. कारण तो साक्षात् विष्णूच या यतिवेषाने येथे प्राप्त झाला आहे. तर तूं त्यास निमंत्रण कर. या व्यासवचनावर विश्वास ठेवून मंडनमिश्राने आचार्यांची शास्त्रोक्त पूजा करून भिक्षे. विषयी प्रार्थना केली. तेव्हां आचार्य म्हणाले, मला अन्नाची भिक्षा नको, तर वादभिक्षा दे. वादांत जो पराजित होईल त्याने विजयी वाद्याचें शिप्यत्व स्वीकारावें. मी सर्वत्र वेदांतमताचा प्रसार करीत आहे. तरी माझे सिद्धांत सत्य व उत्तम म्हणून त्यांचा अंगि- कार कर. किंवा मान्य नसल्यास वादविवाद कर. नाहीतर मी हरलों असें तरी कबूल कर. ते आचार्यांचे भाषण ऐकतांच आश्च- र्याने मंडनमिश्र म्हणतो, वेदाभिप्रेत कर्ममार्ग सोडून या संन्याशाने कल्पिलेल्या अन्य मार्गाचा मी कदापि स्वीकार करणार नाही. प्रत्यक्ष शेषाने येऊन सहस्र मुखांनी जरी मला सांगितले, तरी मी जिंकलों गेलों असे कधीही कबूल करणार नाही. खरोखर आज