पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६) मंडन०-- कथा यज्ञोपवीताभ्यां कस्तत्रापिदुर्वहाम् । मंडन०-'कथां वहसि दुर्बुद्धे गर्दभेनापिदुर्वहाम् । शिखा यज्ञोपवीताभ्यां कस्ते भारोभविष्यति । आचार्य०-कंथां वहामि दुर्बुद्धे तवपित्रापिदुर्वहाम् । शिखायज्ञोपवीताभ्यां श्रुतेर्भारोभविष्यति । मंडन० --लग्न करून पत्नीचे रक्षण करण्यास असमर्थ असा तूं लग्न न करतां संन्यास केलास, व शिष्यांचा समुदाय आणि पुस्त- कांचा व्यर्थ भार वाहणाऱ्या तुझी ब्रम्हनिष्ठा मला दिसतेच आहे. ___ आचार्य०-गुरुशुश्रूषेमध्ये तत्पर व स्त्रीसेवेत निमग्न असलेल्या तुझीही कर्मनिष्ठा मला समजली. ___ मंडन०--स्त्रियांच्या गर्भात नऊ महिने राहिलेल्या व स्त्रियांनीच रक्षण केलेल्या असा तूं स्त्रीजातीची अवहेलना करतोस. आचार्य०-ज्यांचें तूं दूध प्यालास त्या स्त्रीवर्गाशी संग करून त्यांच्याशी तूं रममाण होतोस. ___ मंडन-तिन्हीं अग्नींचा त्याग केलेल्या तुला वीरहत्त्या व इंद्रादि हत्त्यांचे पातक लागले आहे. आचार्य०-परब्रम्हास न जाणणाऱ्या तुला मात्र आत्महत्येचें पातक लागले आहे. ____ मंडन०-द्वारपालांना फसवून तूं चोरासारखा गृहांत कसा बरें आलास? ___ आचार्य०-याचकांना अन्न न देतां द्वारे लावून तूं चोरासारखा अन्न कसा बरे खातोस ? ___ मंडन०-कर्मकाले न संभाप्य अहंमूर्खपण संप्रति ' या पवित्र कर्माच्या वेळी मूर्खाशी संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. आचार्य-या भाषणानें तुझें पांडित्य प्रकट होऊन तूं यतिभंग मात्र केलास.