पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५) आलेल्या संन्याशास पाहून मंडनमिश्र. अतिशय संतापला. तेव्हां उभयतांची जी गूढार्थ गर्भित प्रश्नोत्तरे झाली ती विशेष उद्बोधक वाटल्यावरून पुढे देत आहे. मंडनमिश्र--' कुतोमुंडी' हे संन्याशा, तूं कोठून आलास ? ( आचार्यांनी त्याच्या प्रश्नाचा अर्थ असा केला की, तूं मुंडन कोठ- पर्यंत केले आहेस. या विचाराने ) आचार्य-' आगलान्मुंडी' गळ्यापर्यंत मुंडन केले आहे. मंडनास वाटले की, याला माझ्या प्रश्नाचा अर्थ समजला नाही. तेव्हां तो पुनश्च आचार्यास म्हणतो. ___ मंडन०-' पंथास्तेपृच्छते मया' तूं कोणच्या मार्गाने आलास हे मी तुला विचारतों. तूं मुंडन कोठपर्यंत केले आहेस हे मी तुला विचारले नाही. मंडनमिश्राच्या वचनाचा तुझ्या मार्गाला मी प्रश्न विचारतों असा अर्थ घेऊन, __ आचार्य०-मार्गाला तूं प्रश्न केलास तेव्हां 'किमाहः पंथाः ' मार्गाने तुला काय उत्तर दिले ? असें विपरीत वाक्य ऐकून जास्त त्रासून- मंडन०-' त्वन्मातामुंडा' असें संतापाने म्हणाला. आचार्य०-मार्गाने तुला सत्य सांगितले. कसे, तर मार्गाला तूं विचारलेंस. तेव्हां प्रश्न करणाऱ्या तुला 'त्वन्मातामुंडा' असें मार्गा- कडून योग्य उत्तर मिळाले. प्रश्न न विचारणाऱ्या मला हे उत्तर योग्य दिसत नाही. तरी तूं विचारलेला त्वच्छब्द मद्वाचक कधीही होणार नाही. मंडन- अहो पीताकिमुसुरा' आचार्य०--दारू पिवळी नसून पांढरी आहे. मंडन०-तूं दारूचा वर्णही जाणतोस काय ? आचार्य०-मी तर केवळ रंगच जाणतों पण तूं रसही जाणतोस.