पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४) ण्याचे पुण्य माझ्या नशिबांत दिसत नाही. असो. पण माझा प्रति- सूर्य कर्मठ शिप्य मंडनमिश्र याला वादांत तुम्ही जिंकले म्हणजे तुमचा सर्वत्र विजय होईल. कुमारिलभट्टाचे हे भाषण श्रवण केल्यावर, त्यास अद्वैतब्रह्माचा उपदेश करून आचार्य मंडनमिश्र पंडिताकडे यावयास निघाले. प्रकरण सहावें मंडन पंडिताने मंडित झालेल्या माहिष्मती (महेश्वर, सं. इंदूर) नगरीला आल्यावर आचार्यांनी श्रीरेवा (नर्मदा) नदीचें स्नान केले, व आपले नित्य आन्हिक संपविले. नंतर ते चौकशी करीत मंडनमिश्राच्या घराकडे चालले. वाटेंत मंडनमिश्राच्या घरच्या दासी भेटल्या. ज्या घरांत — स्वतःप्रमाणपरतः प्रमाणं फलप्रदकर्म फलप्रदोजः । जगध्दृवंस्यात् जगद्धवस्यात् ' । वेदांना स्वतः प्रामाण्य आहे काय ? कां परतः प्रामाण्य आहे ? फल देणारे कर्म आहे का ईश्वर आहे ?. जग हे सत्य किंवा मिथ्या? इत्यादि वाक्ये शुकस्त्रिया दारांतच म्हणतांना दिसतील तें घर मंडनमिश्राचे समजा, अशी खूण सांगून त्या दासी निघून गेल्या. मंडनमिश्राच्या दासी व पक्षीही संस्कृत श्रेष्ठ तत्त्वज्ञान बोलतात हे ऐकून आचार्यास आश्चर्य वाटले. वर सांगितलेली खूण पाहात आचार्य मंडनमिश्राच्या दाराजवळ आले. परंतु दार बंद होते. त्यामुळे घरांत जाण्यास मार्ग सापडेना. शेवटीं योगबलाने आकाशमार्गे शंकराचार्य मंडनमिश्राच्या घरामध्ये एकदम प्रविष्ट झाले. त्या ठिकाणी विद्येच्या तेजाने युक्त असलेल्या मंडनमिश्रास जौमनी व व्यास यांचे चरण प्रक्षालन करीत असतांना आचार्यानी पाहिले. कारण त्या दिवशी मंडनमिश्राकडे श्राद्धकर्म होते. अवेळी