पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३) खंडन करण्याकरता तुम्ही आणखी काही दिवस या भूतलीं वास करावा. तुमचे आयुष्य जरी संपले असले तरी मी सोळा वर्षे तुम्हांस अधिक आयुष्य देतो. त्या कालांत अद्वैतमताचा प्रसार करून तत्प्रीत्यर्थ शिष्यशाखा वाढवा. इतकें सांगून श्रीव्यास अंतर्धान पावले. व्यासांच्या आज्ञेनें आचार्य दिग्विजयास प्रवृत्त झाले. कुमारिल- भट्टास जिंकण्याच्या निमित्ताने विंध्याद्रि पर्वताकडे निघाले.जातांनां वाटेंत प्रयागला त्रिवेणी संगमावर स्नान करून आचार्य जात होते. महामीसांसक कुमारिलभट्टाची लोकविश्रुत कीर्ति चहूंकडे ऐकू येत होती. मार्ग काढीत असतांना तुषाग्नीमध्ये ( कोंड्याच्या राशीस अग्नि लावून त्यांत प्रवेश करणे) प्रवेश केलेला अत्यंत विद्वान कुमारिलभट्ट आचार्यास दिसला. प्रखर अग्नीत प्रवेश केलेल्या तशा स्थितीतही आचार्य आलेले पाहन कुमारिलभट्टाने शिष्यांकरवीं त्यांची पूजा केली. कुमारिलभट्टास वाचविण्याकरता आचार्य अभिमंत्रित केलेले उदक अग्नीवर शिंपडणार इतक्यांत या कृत्यास प्रतिबंध करून कुमारिलभट्ट सांगतो, हे श्रेष्ठ यते, तुम्ही केलेले भाप्य मला समजले. त्यावर वार्तिक करावे अशी मला इच्छा आहे. परंतु आतां तें कार्य माझे हातून होणे शक्य दिसत नाही. माझ्या- कडून दोन दोष घडले आहेत. बौद्धाजवळ त्यांचे तत्त्वज्ञान सम- जण्याकरतां वेषांतर करून अध्ययन केलें, व बाहेर येऊन पुनश्च आपल्या वैदिक धर्मास मिळालो. यामुळे बौद्धांचा सांप्रदाय विच्छिन्न झाला. हा गुरुहत्त्या दोष पहिला. व जैमिनीमताने युक्त होऊन केवळ कर्मकांडाने मुक्ती मिळते, परमेश्वर कांहीं करीत नाही, तो तटस्थ आहे, असे मत मी प्रतिपादन करीत आलों हा दुसरा मोठा दोष. बुद्धिपूर्वक केलेल्या या दोन दोषांला देहदंडाशिवाय अन्य प्रायश्चित्त नाही. शाबर भाष्याप्रमाणे शंकर भाप्यावर वार्तिक कर-