पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२) स्वमत टाकून आचार्यांचे शिष्य झाले. समन्वय, अविरोध, साधन व फल अशा चतुर्लक्षणांनी युक्त असे ब्रम्हसूत्र भाप्य लिहिले. शिष्य मंडळीस पाठ सांगत असतां आचार्यांचेकडे एक वृद्ध ब्राह्मण आला, व म्हणाला, व्यासप्रणीत ब्रम्हसूत्रावर तुम्ही भाष्य लिहिले आहे असें ऐकतों. तर त्या सूत्रांचा अर्थ तुम्हांला तत्वतः येत असेलच. तृतीयाध्यायाच्या प्रारंभी असलेल्या ' तदन्तरप्रतिपत्तौ' इत्यादि सूत्रांचा अर्थ सांगा पाहूं. आचार्यानी त्याचा यथाज्ञात अर्थ लावला. त्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाने शतशः विकल्प केले. आचार्यानीं त्या. विकल्पांचे सहस्र तन्हेनें खंडन केले. हा वाद आठ दिवस चालला होता. तेथे हजर असलेले पद्मयादमुनि आचायोस,म्हणाले, महाराज वृद्ध ब्राह्मणाचे रूपाने आलेले हे सूत्रकार प्रत्यक्ष भगवान् वेदव्यास आहेत व आपण तर साक्षात् श्रीशंकर आहात. आपणा उभयतांच्या वादामधे आम्हां अज्ञशिष्यांस काय बरें समजते आहे. आचार्याचें तें दिव्यज्ञान अवलोकन केल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाने मूळ आपल्या श्रीव्यास स्वरूपांत श्रीशंकराचार्यास दर्शन दिले. आचार्यांनी योग्य प्रकारे पूजा करून व्यासांचा गौरव केला. श्रीव्यास पुढे म्हणतात, हे स्वामिन् , तुमच्या या अगाध प्रतिभेने मी संतुष्ट झालो. तुमचें पांडित्यही अखंड आहे. तुम्ही केलेल्या भाप्याचे अभिनंदन करण्या- करतां व प्रत्यक्ष दर्शनाकरता मी आलो होतो. आचार्य पुढे म्हणाले, सर्व उपनिषदांवर मी भाष्ये लिहिली. शिष्यवर्गास ती शिकविली. व विरुद्ध वाद्यांचे निःशेष खंडन केले. मला आतां कांहीं कर्तव्य उरलें नाहीं, व माझ्या आयुष्यसमाप्तीचा काळही समीप आला आहे. तरी आपण क्षणभर थांबावें. मी या जड शरीराचा आपल्या समक्ष गंगेंत त्याग करतो. या गोष्टीचे निवारण करून व्यास म्हण- तात, पृथ्वीवर अजूनही प्रबल असे महान् पंडित आहेत. त्यांचे