पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१) बान् काशीविश्वेश्वर प्रकट झाले. आचार्यांनी अत्यंत भक्तिभावाने नमस्कार करून त्यांचे स्तवन केले. प्रसन्नचित्ताने श्रीशंकर आचा- याँस म्हणतात,दुष्ट लोकांनी वेदांचे विपरीत अर्थ प्रसृत केले आहेत. तूं सर्वशक्ती व सर्वज्ञ असल्यामुळे सर्वश्रुति परब्रह्मनिष्ठ होतील असें वेदांतसूत्रावर अद्वैतपर भाप्य कर. तसेंच श्रुतींतील सूत्रं व इतिहास यावर भाष्य लिहून अद्वैत संप्रदायतत्त्ववेत्त्यांचा मार्ग निप्कं- टक कर. तुझ्या भाष्याचा सर्वत्र प्रसार होऊन ब्रह्मदेवाच्या सभे- तही त्याचा गौरव होईल. अत्यंत कर्मठ मंडनमिश्र, प्रभाकर, शैवनील- कंठ शाक्त गुप्तादि प्रभाकर, व वेदतस्कर असा भास्कर या प्रबळ वाद्यांनां जिंकून माझ्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार कर. इतकें सांगून भगवान् श्रीशंकर गुप्त झाले. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आचार्यांनी ईशादि दशोपनिषदांवर भाष्य लिहिले. ( उपनिषदें-ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडूक्य, ऐतरेय, तैतरेय, छांदोग्य व बृहदारण्यक) व शिष्यांसही उपनिषदें सांगितली. नंतर गीताभाप्य व नानाप्रका- रची स्तोत्रं लिहिली. एकदां सनंदनशिप्य गंगेच्या परतीरावर उभा होता, त्यास आचार्यानी हांक मारली. गुरूंची हाक ऐकून सनंदन मनांत विचार करतो की,गुरुभक्ती ही केवळ लोकांनां संसारसागरां- तूनच तारते कां नदीवरूनही तरून नेते. इ० विचार करून व गुरुचरणाचें ध्यान करून सनंदन नदीवरून चालू लागला. गंगेनें त्याची गुरुनिष्ठा पाहून सनंदनाच्या प्रत्येक पावलाखालीं कमल उत्पन्न केले. तसाच गुरुभक्तिबलाच्या योगाने नदीवरून सनंदन चालतच गुरूकडे आला. त्याला प्रेमाने आलिंगन देऊन आचार्यानी त्याचे यथायोग्य पद्मपाद' असें नांव ठेविलें. आचार्यांच्या अद्वैतपर भाष्यावर कांहीं कुतर्कवादी पंडितांनी आक्षेप घेतले. परंतु आचा- यांनी त्यांच्या मताचे युक्तिप्रयुक्तीने निरसन केल्यावर, ते पंडित