पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०) आपले सांगणे आहे यांत संशय नाही. आपले अंतःकरणही उदार आहे. पण आत्मसुख हे संगरहित असतांना तूं व मी असा भेद- भाव आपण दर्शवितां हे विचित्र नव्हे काय ? काषायवस्त्र धारण करणारे तुझ्यासारखे पुष्कळ संन्याशी लोकांना नानाप्रकारें फस- वीत असतात. बरें आतां तूं जे मला बाजूला हो असें म्हणालास. तें या देहीला (आत्म्याला) किंवा देहाला. तर दोन्ही पक्षी तुझें म्हणणे यथार्थ होत नाही. अन्नमय पार्थिव शरिराला-देहाला उद्दे- शून तुझें म्हणणे असेल, तर तुझें जसे शरीर तसेंच माझंही शरीर आहे. देही (आत्म्याविषयीं) विषयीं असेल तर तो सर्वत्र एकरूप असल्याने हा ब्राम्हण व हा अंत्यज, असा भेद त्याचे ठिकाणी संभवत नाही. मदिरा व गंगा जरी पृथक् असली तरी त्यांत प्रति- बिंबित झालेले सूर्यबिंब हे एकच असते. त्याप्रमाणे शरीरें जरी निरनिराळी असली तरी आत्मा हा एकच आहे. मग मी चांडाळ व तूं ब्राह्मण असें कसें म्हणतोस ? शरीरांत पुराणप्रसिद्ध व सच्चिदा- नंद स्वरूप असलेला असा आत्मा त्याला विसरून तूं देहाविषयी वृथाभिमान कां धरतोस ? कोणीकडे ही पुण्यपवित्र काशी नगरी, व कोठे हा जनतेस ठकविणारा तुझा संन्यास वेष. हा सर्व मायेचा प्रभाव असल्याने मोठे मोठे पंडितही मोहित होऊन भ्रम. पावतात तेथे तुझी प्रतिष्ठा काय ! त्या चांडालाचे हे अद्वैतपर भाषण आचार्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतले व ते म्हणाले, बाबारे, तूं जे हे तत्वज्ञान सांगितलेस ते सर्व खरे आहे. सर्व शास्त्रपारंगत असे अनेक पंडित जगांत आहेत. परंतु तत्त्व जाणणारे वाचतच सांपडतील. __ तेथेंच आचार्यानी · मनीषापंचक स्तोत्र , केले. त्याबरोबर त्या चांडालाचे स्थानी वेदचतुष्टयांनी युक्त असे साक्षात् श्रीभग-