पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मानसिक विधीने त्यांनी श्रीकाशीनाथाचे पूजन केलें, श्रीशंक- राची ' शिवाशांताकारं भवभूति जरा शून्य मरणं' या श्लोकाने व " शिवां शंकरस्यार्ध देहां विशुद्धां '. इत्यादि सुभाषितांनी अन्नपूर्णेची स्तुति केली. श्रीकाशीनाथाचे सहपरिवारें पूजन करीत, मोक्षदायक व पुण्यपावन श्रीकाशीक्षेत्रांत श्रीशंकराचार्य आनंदाने कालक्रमण करूं लागले. प्रकरण पांचवें चौलप्रांतांतील विषयरूपी विषयाने ग्रस्त झालेला, संसारापासून विरक्त झालेला एक ब्राम्हण दीन वदनाने आचार्यांचेकडे आला. त्याची सात्विक वृत्ती अवलोकन करून आचार्यांनी त्यास शिष्य केले व त्याचे सनंदन असें नांव ठेविलें. तोच पुढें पद्मपाद या नांवाने प्रसिद्धीस आला. तसेच चित्सुक, आनंदगिरी, इत्यादि शिप्यवृंद वट वृक्षाखाली आचार्यांची सेवा करीत राहिले. ते सर्व सनंदनाप्रमाणे विरक्तच होते. श्मश्र व दाढी वाढलेले असे वृद्ध शिष्य आणि अगदी तरुण असे गुरु श्रीशंकराचार्य असा हा आश्चर्यकारक समागम चित्ताल्हादक व नयनमनोहर होता. खाली दिलेल्या श्लोकांत त्याचे यथायोग्य स्वारस्य आढळतें. चित्रं वटतरोमूले वृद्धाः शिष्यागुरुयुवा गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तच्छिन्नसंशयाः। - एकदां आचार्य स्नानास गंगेवर जात असतांना, चार कुत्रीं बरोबर घेऊन एक चांडाल समोरून येत होता. तो अगदी जवळ आल्यामुळे आचार्य त्यास म्हणतात. अरे जरा बाजूला हो. मला स्पर्श करूं नकोस. असें आचार्यांचे भाषण ऐकतीच स्मितपूर्वक तो चांडाल म्हणतो, हे यातमहाराज, वेदांतसिद्ध, न्याययुक्त असे