पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८) ही गोष्ट गुरुजींस समजल्यावर त्यांना फारच आनंद झाला. ते आनंदून आचार्यास म्हणाले, स्थितप्रज्ञ अशा हे श्रेष्ठ शिष्यवरा, तुला शरदऋतूंतील स्वच्छ चंद्रप्रकाशाप्रमाणे स्वतः सिद्ध असें आत्मज्ञान आहे. तू आतां श्रीक्षेत्र वाराणशीस जा, आणि तेथील मुमुक्षुजनांस तत्वज्ञानाचा उपदेश करीत तेथेच रहा. एवढे बोलून श्री गोविंदपाद आचार्यास एक पूर्वांचा वृत्तांत सांगू लागले. 'पूर्वी हिमालयावर मुनींच्या महासभेत श्री वेदव्यास वेदांतावर प्रवचन करीत होते. त्यावेळी मी ज्यासांना विचारिलें की, आपण सर्व वेदांचे विभाग केले. भारतादि महाग्रंथ, ब्रह्ममीमांसा व योग- भाष्यही लिहिले. या सर्व श्रेष्ठ तत्वज्ञानाचा अर्थ काही लोक विप- रीत करीत आहेत. यास्तव आपण स्वतः हा विपरीत परिणाम टाळण्याकरतां वेदनिर्णायक असें एक भाप्य तयार करा. त्यावर भगवान् यास मला म्हणाले, आपण विचारलेला हा प्रश्न पूर्वीच देवांनी श्रीशंकरास विचारला होता. तेव्हां भगवान् श्रीशंकरांनी मी स्वतःच अवतार घेऊन हे कार्य करीन असे सांगितले. व आपल्या कमंडलूत नर्मदा नदीचे सर्व उदक जो भरून दाखविल अशा तुमच्या शिप्याकडूनच वेदार्थ प्रकाशक असें भाप्य होणे शक्य आहे असें ज्यास मला म्हणाले. श्री गोविंदयती पुढे म्हणतात, भिक्षो, उपरिनिर्दिष्ट पूर्व संकेतावरून तूंच हे कार्य कर. व तत्त्व- ज्ञानोपदेश करून जगाचा उद्धार करण्यास काशीस जा. तेथे श्री काशीविश्वेश्वर तुला प्रत्यक्ष दर्शन देईल. इतकें सर्व भाषण झाल्यावर गुरुजींस नमस्कार करून आचार्य काशीस गेले. त्यांनी तेथे गेल्या- वर · शिवा शान्ताकारं हरिहर निजावास धरणी' या श्लोकानें ग्रामदेवतेची स्तुती केली. गंगेवर जाऊन शास्त्रविधीप्रमाणे स्नानदि सर्व ब्रह्मकर्म करून गंगेची प्रार्थना केली, श्रीकाशीश्वराचे मंदिरांत he