पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७)

-

नर्मदेच्या प्रशांत व रम्य अशा तीराने जातांना आचार्य श्री- गोविंद पूज्यपादांचा आश्रम शोधू लागले. एका ऋषीने या अरुंद द्वाराने आंत जा म्हणजे तुम्हांस श्री गोविंदगुरु भेटतील असें सांगतांच आचार्य आंत गेले, व त्यांनी लांबूनच श्रीगोविंद- पादांना साष्टांग नमस्कार घातला. आणि त्यांचे सद्गदित वाणीने ते स्तवन करूं लागले. स्तवनाने प्रसन्न होऊन नेत्र उघडून श्रीगोविंदयती विचारतात की, हे वत्सा, तूं कोण आहेस व तुझें काय कार्य आहे ? तेव्हां नम्रपणे आचार्य म्हणाले:- मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं नच श्रोत्रजिन्हा नच घाण नेत्रं । नच व्योम भूमिःन तेजो न वायु: चिदानंदरूपः शिवोहं शिवोहं। मन, बुद्धि, अहंकार,चित्त,श्रोत्र,जिव्हा घाण, नेत्र, आकाश,वायु, भूमी,तेज यापैकी मी कोणीही नाही, तर केवळ सच्चिदानंद स्वरूप असा आहे. या भाषणाने प्रत्यक्ष श्रीशंकरच या बटुवेषाने आले आहेत असें दिव्य दृष्टीने जाणून श्रीगोविंदपादांनी आचार्याकडून तेथे असलेल्या श्रीपादुकांची पूजा करविली. नंतर चतुर्थाश्रमाची दीक्षा दिल्यावर शाश्वत व अद्वैत अशा ' अद्वैत ब्रम्हाचा तत्वमस्यादि' महावाक्यांनी आचार्यास उपदेश केला. श्रीगोविंदपाद एकदा ध्यानस्थ असतां नर्मदेस महापूर आला, त्या योगाने प्रचंड असा दीर्घ ध्वनी नदीचा होत होता. या नादाने आपल्या गुरुजींच्या समाधीचा भंग होईल या भीतीने आचार्यांनी आपल्या कमंडलू- तील थोडेसें उदक आभमंत्रण करून नदीवर प्रोक्षण केले. चम- कार असा की एवढी मोठी प्रचंड तुफान झालेली नर्मदा नदी. पण ती शांत होऊन प्रवाहरूपाने आचार्यांच्या कमंडलंत येऊन सामावली. एवढें अफाट पाणी पण तें सर्व कमंडलूत राहिले. पुढे २