पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६) , , मी या वेळी तर भयंकर संकटांत सांपडलों आहे. आर्यांबा विचार करते, मुलगा संन्यास का करीना. पण जीव जाण्यापेक्षां संन्यास बरा. मग आईने चतुर्थाश्रम घेण्यास आचार्यांस आज्ञा दिली. इकडे आचार्यांचा पायही नकाने सोडला. व आचार्य वरती आले. मुलगा संकटांतून वांचल्याबद्दल आईने परमेश्वराचे उपकार मानून ती आपल्या बालकास प्रेमाने भेटली. पुढे आचार्य म्हणतात, मातोश्री, आपल्या पित्याचे जे कोणी धन घेतात त्यांनी आपल्या आईचा सांभाळ करावा, असे शास्त्रवचन आहे. तुला जेव्हां दुःख प्राप्त होईल त्यावेळी तूं माझें स्मरण करतांच मी तुझ्यावळ आहे असे समज. मला अनाथ टाकून माझा मुलगा निघुन गेला, असा शोक तूं करूं नकोस. तुझ्याजवळ राहाण्यापेक्षा लांब राहूनच मी शेकडो- पटीनी जास्त तुझें संरक्षण चांगल्या रीतीने करूं शकेन. नंतर आचार्य आपल्या बांधवांस म्हणतात, मला चतुर्थाश्रम घेण्याची अत्यंत उत्कंठा प्राप्त झाली आहे. तर तुम्ही माझ्या मातेचा उत्तम प्रकारे सांभाळ करावा अशी माझी इच्छा आहे. या भरवशाने मी आईस तुमच्या स्वाधीन करीत आहे. बांधवांनीही या गोष्टीस अनुकूलता दर्शविली. आईचें सांत्वन करून व तिला भक्तिपूर्वक नमस्कार केल्यावर आचार्य आपल्या उद्दिष्ट कार्याकरितां घरांतून बाहेर पडले. मायेचें हे लौकिक बंधन सुटल्याबरोबरच आचार्याचा संन्यास झाला, असे म्हणावयास हरकत नाही. मर्यादित जागेत राहून त्यांचे कार्य साधले नसते. गृहदारादिक प्रपंचाकरता ते अवतरले नव्हते, तर परमेश्वरप्रणीत वैदिक धर्मावर जें प्राणहारक संकट कोसळले होते त्याचे निवारण करून भारतवर्ष ज्ञानसंपन्न करणे याप्रीत्यर्थ त्यांचे अद्भुत चरित्र व्हावयाचे होते, म्हणून ते सर्वस्वाचा त्याग करून बाहेर पडले.