पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५) मुक्त होण्याकरतां मला तूं चतुर्थाश्रम स्वीकारण्याची अनुज्ञा दे. मुलाचे हे भाषण ऐकतांच आयोबेचा शोक द्विगुणित झाला. व म्लान वदनाने ती म्हणते, बाळा, या वयांत हा विचार तुला योग्य दिसत नाही. प्रथम गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. यज्ञयागादिकें- करून सर्वत्रांची ऋणे फेड. व तदनंतर वाटल्यास तूं म्हणतोस तो आश्रम स्वीकार. मला एकटीला असहाय्य स्थितीत टाकून जाणे हैं पुत्रधर्मास योग्य नव्हे. आचार्यांनी आईची समजूत घाल- ण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हां आचार्य विचार करतात की, मी गृहस्थाश्रम तर घेणार नाहीच. त्याबरोबरच पण आईही संन्यासाला अनुमति देत नाही. 'नमातुर्दैवतपरं ' आईवांचून दुसरें दैवत नाही. असें तर शास्त्र- वचन आहे. त्यामुळे आईची आज्ञाही मोडता येत नाही, व माझा जन्म तर वेदांताचा उद्धार करण्याकरतांच झाला आहे. अशा परस्परविरुद्ध गोष्टींनी माझें कार्य कसे होणार? याकरितां कांही तरी युक्ती योजिली पाहिजे, असे मनाशी ठरवून आचार्य आपल्या नित्यो- द्योगास लागले. दुसरे दिवशीं आचार्य स्वानाकरतां गंगेवर गेले. गंगेत स्नान करतांना नकाने त्यांचा पाय धरला. पायास वेदना फार झाल्याने ते आई आई असें म्हणून मोठ्याने रडू लागले. मुलगा कां बरें रडतो, हे बघण्याकरतां आर्याबा धावून आली. मुलाची ती बिकट परिथिती पाहून आसपासही सहाय्य करण्यास कोणी नाही असे पाहातांच आयर्यांबा मोठ्यानें आक्रोश करूं लागली. आपल्या मातेची ती कष्ट-प्रद स्थिती दिसतांच आचार्य आईस म्हणतात, आई तूं मला संन्यास करण्याची परवानगी देत असलीस तर हा नक्र माझा पाय निश्चित सोडील व माझा अपमृत्यूही टळेल. याउपर तुझी जशी मर्जी असेल तसे कर.