पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४) लागले. उपरिनिर्दिष्ट ऋषी घरी येतांच आयांबेस आनंद झाला व तिने मधुपर्कपूर्वक त्यांची पूजा केली. ते ऋषी प्रसन्न आहेत असे पाहून आर्याबा त्यास म्हणाली,भगवन्, माझ्या शंकराचे आयुष्य किती परे आहे ? तेव्हां अगस्त्य म्हणतात, तुमच्या या बुद्धिमान् व सर्वज्ञ मुलाचे आयुष्य सोळा वर्षांचे आहे. पण तुमचा मुलगा आणखी काहीं अन्य उपायांनी सोळा वर्षांचे जास्त आयुष्य मिळवील. असें सांगून व आचार्याची भक्तिपूर्वक भेट घेऊन ते मुनिपुंगव निघून गेले. अगस्त्यऋषीच्या भाषणाने आपल्या मुलाचे आयुष्य फार थोडें आहे असे कळतांच आर्याबेस फार वाईट वाटले व ती शोका- कुल झाली. पतीच्या पश्चात् वैधज्य दु:खाने हे निंद्य जीवित कंठणें अतिशय कठीण; परंतु या लहान मुलाकडे लक्ष देऊन कसें तरी समाधान मानावयाचे, परंतु तोही अल्पायुषी. या विचाराने ती कष्टी झाली. आईचे सांत्वन करण्याकरितां आचार्य म्हणतात हे माते, तूं शोक को करतेस ? माझ्याकरितां शोक करणे वृथा आहे. या शोकाचा अंत कधीतरी होईल काय ? हा दु:खमय संसार आहे. त्यांत अशी इष्टानिष्ट सुखदुःखें प्राप्त होणारच. प्राणी जन्मतांच आपल्या- बरोबर मृत्यूला घेऊन येतो. बरें तूं असें पहा की- 'नाहं तेषांममैतेनोग्यासेनोक्तमिदंवचः । मातापितरें कोण कोणाची. मुलें तरी त्यांची कशी ? जन्मापुरता आलेला क्षाणक संबंध नित्य स्वरूपाचा आहे काय ? नाही. तर हा सर्व श्रम आहे, असत्य व अनित्य अशा मायापाशांत गंतन व्यर्थ शोक करणे अज्ञपणाचे ठरेल. माझा तुझा अर्थाअर्थी कांहीं एक संबंध नाही. सर्व प्राणी अदर्शनापासून उत्पन्न होतात व अदर्शनांतच लीन होतात. खरोखर आखिल जगाला आधारभूत अशी एक ब्रह्मवस्तूच नित्य आहे, तेव्हां या सर्व मायाजालांतून