पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३) राजशेखर नृपति, त्याने आपल्या अमात्याबरोबर बहुमूल्य वस्त्रा- लंकार देऊन आचार्यांना आपल्या राजधाधीला आणण्याकरितां मोठ्या इतमामाने पाठविलें. तो नम्रतेनें अचार्यास येऊन भेटला. त्याचे योग्य तें स्वागत केल्यावर राजाचा निरोप ऐकून घेऊन पुढे आचार्य म्हणतात, पवित्र भिक्षान्नाने माझा निर्वाह होतो. अजि- नाचे योगाने शीताचे निवारण व वस्त्रप्रावरणाची चिंता दूर होते, स्वधर्मकर्मानुष्ठानामुळे मला सतत समाधान वाटत आहे. तेव्हां तुमच्या राजाकडे येऊन मला काय मागावयाचे आहे ? ते ऐकून अमात्य परत राजाकडे गेला. अमात्याचे मुखाने आचार्यांचे वचन ऐकून राजशेखर स्वतः आचार्याकडे आला. यथाविधि त्याने आचार्यांची पूजा केली. व एक अयुतद्रव्य (दहा हजार सुवर्ण- नाणे ) आचार्यास दक्षिणा म्हणून अर्पण केले. नंतर प्रार्थनापूर्वक स्वतः केलेली तीन नाटके त्याने आचार्यास भक्तिपूर्वक वाचून दाखविली. त्या त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन व त्याचे इष्ट मनोरथ ओळखून आचार्यांनी त्यास पुत्रप्राप्तीचा वर देऊन संतुष्ट केले. मनोरथ सिद्धीस गेल्यामुळे राजशेखर फारच आनंदित झाला, व पुनश्च आचार्याचे पूजन करून प्रमु.. दित चित्ताने आपल्या राजधानीकडे निघून गेला. प्रकरण चवथें एकदां उपमन्यू , दधीची, गौतम व अगस्त्य इत्यादि ऋषि श्री- शंकराचार्यांना पाहण्याकरतां आले. अल्पवयांत झालेला कीर्तिपरि- मल चहूंकडे पसरला होता. तेव्हां हा काय अद्भुत चमत्कार आहे हे पाहण्याकरतां मोठेमोठे पंडित व ऋषिवृंद आचार्याकडे नित्य येऊ.