पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) कशी करूं? तेव्हां आचार्य म्हणतात, माझ्यावर तर तुझी कृपादृष्टि आहेना ? एवढ्याकरता मी सांगतो म्हणून या विप्रास धनवान् कर. इतक्यांत लक्ष्मीच्या कृपादृष्टीने त्या ब्राह्मणाचें घर सुवर्णाच्या आंवळ्यांनी परिपूर्ण भरलें. हा चमत्कार दृष्टीस पडतांच त्या विष पतिपत्नींना अतिशय आनंद होऊन ते आचार्याचे चरणी नम्र होऊन स्तवन करू लागले. अशाच अनेक दिग्य चमत्कृतिपूर्ण गोष्टींनी अल्पवयांतील हे बालक सर्वत्र आदरास पात्र झालें. अगाध विद्वत्ता, सहजस्फूर्तीने होणारे उत्कृष्ट भारदस्त वत्कृत्व, कुमतांचे, तत्काळ खंडन करावयाचे अप्रतिम गुणधैर्य, व शुद्धाचरण या व अशाच अनेक प्रकारच्या गुणसमुच्चयामुळे बहुजनसमाजावर त्यांची विलक्षण छाप बसली. त्यामुळे भाविक जनता त्यांची आद- रानें सेवा करूं लागली. सातवे वर्षी गुरुगृहांतून विद्या संपवून परत घरी आल्यावर आचार्य स्वमातेची-आर्याबची सेवा करूं लागले. एकदां आयोवा स्नानाकरतां पूर्णा नदीवर गेली. द्धाप- काळ झाल्याने व सूर्याच्या प्रखर तापाने पीडा होऊन ती नदी- वरच मूर्छा येऊन पडली. आईस घरी येण्यास उशीर लागलेला पाहून आचार्य लगेच नदीवर गेले. आईची ती भयप्रद स्थिति पाहतांच आचार्यास फारच वाईट वाटले. आईस सावध करून ते दोघेजण घरी आले. आचार्य मनांत विचार करतात की, नदी लांब असल्याने आईस पाण्याचे फार श्रम होतास. मातेचा दुःख- भार हलका करून तिला सुखी करणे हे आपलें पुत्रकर्तव्य आहे. असें जाणून त्यांनी श्रीगंगेची ललितपद्यांनी स्तुती केली. त्या स्तवनाने संतुष्ट होऊन श्रीगंगामाता (नदी) दुसरे दिवसापासून प्रवाहरूपाने आचार्यांच्या घराजवळून वाहूं लागली. ही कीर्ति सर्व प्रदेशावर पसरली. ती ऐकून केरला. धिप जो