पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११) कृति करून चिरकाल कीर्तिपरिमलाने जगतांत विलसणार असें त्यांच्या गुरूसही वाटून त्यांना आनचार्याबद्दल कौतुक व सप्रेम अभिमान उत्पन्न झाला. त्या अल्पवयांत त्यांचे इतकें उत्कृष्ट वक्तृत्व होते की, कोणीही त्यांच्यापुढे बोलण्यास धजेना. सहज लीलेने ते कुमतांचा पाडाव करूं लागले. एकेवेळी आचार्य एका निर्धन ब्राह्मणाकडे भिक्षेकरतां गेले. त्या ब्राह्मणाचें दैव उदयास यावयाचे होते, म्हणून किंवा आचार्यास त्या सत्पात्र गरीब ब्राम्ह- णास धनवान् करावें, एतदर्थ : आचार्य तेथे आले. ( या वेळी आचार्य गुरुगृहीं विद्याभ्यासासास्तव राहिले होते. ) ब्राम्हणाचे घरांत गेल्यावर ॐ भवति भिक्षादेहि, असें नित्याप्रमाणे ते म्हणाले. तेव्हां त्या निर्धन ब्राम्हणाची भार्या सत्वर धांवत पुढे आली व तिनें अतिथीस आदराने नमस्कार करून लीनतेने म्हणाली, महाराज, आपण आम्हां दीनांचे घरी येऊन आम्हांला पावन केले आहे. आपला हा आमच्यावर अनुग्रहच म्हणावयाचा. आपणास भिक्षा घालणारे जे कोणी भाग्यवान् प्राणी असतील, ते खरोखर धन्य होत. आम्ही दुर्दैवी पातकी लोक. निर्धनतेमुळे तुम्हांस आमच्या येथे भिक्षाही मिळू नये ही खरोखर आम्हांस लाजिरवाणी गोष्ट आहे व यामुळे माझ्या मनाला अतीशय खेद होतो. असे म्हणून तिने घरांत असलेला एक आमलक ( आंवळा ) भिक्षेमधे घातला. विप्रस्त्रीचें तें दीन भाषण श्रवण होतांच दयार्द्र होऊन आचार्यांनी श्रीमहालक्ष्मीचें ध्यान केलें. ध्यानाच्या योगाने महा- लक्ष्मी संतुष्ट होऊन प्रत्यक्ष आचार्यांच्या समोर उभी राहिली, व काय आज्ञा आहे अशी तिनें पृच्छा केली. आचार्यांनी या गरीब ब्राम्ह- णास सधन कर, असे सांगतांच श्रीलक्ष्मी म्हणते, या ब्राम्हणानें द्रव्य प्राप्त होण्याइतके पुण्य केले नाही, तेव्हा मी त्याच्यावर दया