पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०) प्रकरण तिसरें थोरांचे सर्व आयुष्यच जेथें असामान्यपणे व्यतीत होते, तेथे त्यांचे बालपण तरी सामान्य मुलासारखे कसें जाणार ! प्रथम वर्षांच श्रीशंकराचार्य देशभाषा ( मातृभाषा ) बोलू लागले. दुसऱ्या वर्षी वर्णविज्ञान लिहिणे, वाचणे पूर्ण येऊ लागले. त्याबरोबरच पुराण व कथा श्रवण करूं लागले. दुर्दैवाने तिसरे वर्षी आचार्यांचे वडील शिवगुरु कालवश झाले, आर्यांबेवर पतिनिधनामुळे वैधव्याचा दुर्धर प्रसंग कोसळला. पित्याच्या आकस्मिक व अकाली निधना- मुळे आचार्याचा घरांतील आधारच नाहीसा झाला, व आपल्या या अल्पवयी मुलाचे पुढे कसे होणार याची हृदयविदारक काळजी आयोबेस रात्रंदिवस जाजू लागली. झाल्या गोष्टीस इलाज नाहीं असे समजून आचार्यांनी व आयोबेने आपला नित्याचा क्रम चालू ठेवला. याच सुमारास किंचित् पण स्वाभाविक अशी ग्रहण- शक्ति ( प्रतिभा ) चरित्रनायकाचे ठिकाणी उत्पन्न झाली होती. चवथ्या वर्षी श्री भगवान् शंकरांच्या प्रसादाने त्यांना सर्वज्ञता प्राप्त झाली. पांचव्या वर्षी चौलादि तत्पूर्वी करावयाच्या सर्वःसंस्कारा- सह आचार्यांचे त्यांच्या गुरूने उपनयन केले व वेदाध्ययनास आरंभ झाला. गुरूने एकदां सांगतांच व एकवार म्हणतांच पाठ होई. सर्वज्ञ आचार्यास कोणची कला अवगत नव्हती ? परंतु लोक ज्यवहाराकरतां व गुरूंची परंपरा टिकावी याकरतांच त्यांना गुरुजीकडे जाणे भाग पडले. चतुर्वेदांचे अध्ययन सांगोपांग (शिक्षा, कला, ज्याकरण, निरुक्त, छंदासह. मुंडक० १-५) होतांच आचार्य वेदावर प्रवचन करूं लागले. अष्टवर्षापर्यंत अतिअल्प- वयांत चतुर्वेदांचें सार्थ अध्ययन पूर्ण करणारे हे बालक पुढे अपूर्व