पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) आहेत. अशी विशेष प्रकारची देणगी परमेश्वराने मनुप्यास काय दिली आहे, तर ती म्हणजे अत्युच्च प्रकारची बुद्धिमत्ता व विचार- शक्ति. ही विवेकशक्ति इतर प्राण्यांचे ठिकाणी आहे काय ? तर नाही. बुद्धिहीन पशुपक्ष्यांमध्ये आपणांस परमेश्वराने उत्पन्न केलें नाही, तर उच्चतर अशा मानवांमध्ये आपणांस उत्पन्न केले, याबद्दल त्या परमेश्वराचे उपकार आपण स्मरावयास नकोत काय ? उपकारकाचे उपकार विसरणे हे कृतघ्नपणाचे ठरेल. परमे- श्वराच्या अमोल उपकाराची जाणीव ठेवून त्या दीनदयावन परमे- श्वराची आराधना आपण एकनिष्ठेने करावयास पाहिजे. ती सेवा मग कोणत्याही स्वरूपाची का असेना. ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे, व असणाऱ्या गुणवैशिष्टयाने देवास आळविण्याचा प्रयत्न बुद्धिपुरस्सर करावा. भारतवर्षामध्ये साधुसंतांच्या, तत्त्ववेत्त्यांच्या व योगीजनांच्या रूपाने अवतार घेणारे जे जे असामान्य लोकोत्तर पुरुष होऊन गेले, ने ते सर्व ईश्वराचे अंश होते याबद्दल संशय नाही. त्या सर्व महान् व्यक्तींमधे श्रीशंकराचार्याचा अवतार अनुपमेय व अग्रेसर ठरेल. यांचीच सेवा वाङ्मयरूपाने मी यथामति चरित्ररूपाने करीत आहे, प्रथम प्रकरणांत वर्णन केल्याप्रमाणे धर्ममतांचा सर्वत्र गलबला माला व त्यामुळे भाविक जनता फार ज्याकूल झाली. भगव- हितेत सांगितल्याप्रमाणे श्रीशंकरांना सनातन वैदिक धर्माचा होत नसलेला हास थांबविण्याकरतां अवतार घेणे भाग पडले. कर्म- पासना-ज्ञान, असा कांडत्रयात्मक जो वेद, त्याचा उद्धार केला सतां ब्राह्मणांचा उद्धार होईल. ब्राह्मणांचे रक्षण केल्याने सर्व गाचे कल्याण होईल. कारण सर्व वर्णाश्रमधर्माचें मूळ कारण राह्मण आहेत. ' ब्राह्मणत्वस्यहि रक्षणेन रक्षितस्यात् वैदिको धर्मः।