पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६) तदधीनत्वात् वर्णाश्रम भेदानाम् । असें आचार्यभाप्य आहे. अशा- प्रकारे जगताच्या उद्धाराकरितां अवतार घेण्याचे सर्व देवांनी ठर- विले. पृथ्वी शंकरास शरण गेली. तेव्हां श्रीशंकर, ब्रह्मदेव व इंद्रादि देवतांनी अनुक्रमें, श्रीशंकराचार्य, मंडनमिश्र व सुधन्वा नृपति या रूपाने अवतार घेण्याचे ठरविले. श्रीविष्णु हे संकर्षण, व शेष हा पतंजली होईल. षडानन सुब्रह्मण्य होईल. याप्रमाणे पृथ्वीस आश्वासन देऊन देवांनी या भूमंडलावर अवतार घेतले. हे अवतारी पुरुष अत्यंत विद्वान होते. त्यांनी आपल्या दिव्य विद्वत्तेच्या प्रभा- वाने सर्व जनतेची मनें आकर्षण केली, व त्यांचे विलक्षण वजन जनतेवर पडलें. पतंजली व संकर्षण यांनी कर्मकांड व उपासना- कांडाचा उद्धार केला. सुब्रम्हण्याने जैमिनीकृत मीमांसाशास्त्राचा उद्धार केला. सुधन्वा हा प्रथम जैनांचा आभमानी होता. वाद- विवाद करीत भट्टपाद सुधन्वा नृपतीकडे आला. त्याचा सुधन्याशी वादविवाद झाला. त्यांत भट्टपादानें जैनमतांचे खंडन करून राजास सनातन वैदिकधर्माचा उपदेश केला. भट्टपादाचा व जैन पंडितांचा फार उग्र स्वरूपाचा वाद झाला. परंतु जैनांचें कांहीं समाधान झाले नाही. शेवटी जैन पंडितांनी भट्टपादास तुमचा धर्म ईश्वरप्रणीत आहे ना? तर मग तुझी पर्वतावरून खाली उडी व्या. या दिव्यांत जर तुमी सुरक्षित राहिलात तर तुमचा धर्म सत्य, प्रत्यक्ष ईश्वरप्रणीत आहे असे आह्मी समजूं. या दिव्यास कबूल होऊन भट्टपादानें पर्वतावरून परमेश्वराचें ध्यान करून खाली उडी टाकली. चमत्कार असा की, परमेश्वर खराच वैदिक धर्माचा पाठी- राखा होता, ह्मणून भट्टपादास फुलांच्या राशीवर आपण उभे आहोत असा भास झाला, व त्यास कोणच्याही प्रकारची इजा झाली नाही. तरीही समाधान न झाल्याने सुधन्वा नृपतीने वादाचा अखेरचा