पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) सारखे भीमपराक्रमी व त्रैलोक्यास संत्रस्त करणारे महाप्रचंड दैत्य ज्याने आपल्या शक्तिप्रभावाने धुळीस मिळविले, त्या परमे- श्वराचे गुणानुवाद किती वर्णन करावे ! वृद्ध, तरुण व बालक स्त्री- पुरुषांच्या व अखिल प्राणिमात्राच्या अंतरामध्ये जो जीवस्वरूपाने भासतो, तसेंच पंचमहाभूतांच्या जगज्यापक असामान्य शक्तीने जो अनुभवास येतो, ज्याची स्तुति करतांना महान् तत्त्वज्ञानी, तपो- निधि, संतमहात्मे श्रमी झाले, 'नेति नेति' असें म्हणून ज्या वेदालाही या ईशस्वरूपाचे पूर्ण ज्ञान न झाल्यामुळे स्वस्थ बसावें लागले, तो परमेश्वर कसा आहे, हे मी पामर काय सांगू शकणार! व्यक्ताव्यक्त भेदाभेद, सगुण, निर्गुण सूक्ष्म व पर्वताकार बुद्धिगम्य व अचिंत्य व अशाच त-हेच्या सर्वतोपरी बुद्धीस कुंठित करणाऱ्या त्या मायातीत परब्रह्माचें ज्या ज्या तन्हेनें गुणगान करावे तेवढे अपु- रेंच पडणार आहे. मानवी कर्तत्व श्रेष्ठ, का ज्या अध्यक्त अस- णाऱ्या प्रभूने हा सर्व स्थावरजंगम असा अखिल विश्वसंसार उत्पन्न केला, त्याचे उपकार श्रेष्ठ ? या विश्वाचा आधारभूत असणारा तो परमेश्वर सर्वत्र भरला असून, निमित्तमात्र काहीं काय उत्पन्न करून कोणातरी व्यक्तीकडून ते कार्य पूर्ण शेवटास नेतो, तोच परमात्मा श्रेष्ठ होय. कर्ता करविता असा मूळ तोच श्रीहरि आहे. तेव्हां सामान्य माणसाने कर्तत्वाचा वृथाभिमान कशास मिरवावा ? प्रज्ञावान् लोक या असत्य असणाऱ्या अहंकारा- पासून अगदी अलिप्त असतात. व या श्रेष्ठभावना बलाच्या योगाने ते संत महात्मे पदास प्राप्त होऊन व परमेश्वरस्वरूपांत समरस होऊन कीर्तिपरिमलाच्या योगाने ते टिकले, व यावच्चंद्रदिवा- करौ' ते टिकतील. प्राणिमात्रामध्ये अधिक योग्यता या नरदेहाची आहे. व देवाने इतर जीवजंतूंपेक्षां मनुष्यावर फार उपकार केले