पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशी भीती उत्पन्न झाली. राज्यक्रांतीपेक्षां धर्मक्रांति फार अनर्था- वह होते. प्रसंगविशेषीं राज्यक्रांतीचेही निवारण करता येईल; परंतु लोकांच्या मनोभूमिकेंत धर्मपरिवर्तनाचे बीज एकदा कां रुजले, की मग त्या परधर्ममतांचा नाश होण्यास महान् प्रयास पडतात. व कधी कधी तर तें कार्य अशक्य कोटींत येऊन बसते. तो प्रसंग उग्र स्वरूपाने दृष्टीसमोर नाचू लागला, व यावेळी जर योग्य तो प्रतिकार झाला नाही तर सर्वत्र देश बुद्धमय होऊन जाईल, व परमेश्वराच्या श्वासोच्छ्वासरूपानें प्रकट झालेला वैदिक धर्म लुप्त होऊन, यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं । ही वरील भगवदुक्ति मिथ्या ठरेल; म्हणूनच पूर्वसंकेतानुरूप श्रीभगवान् शंकरांनी श्रीशंकराचार्यांचे रूपानें अवतार घेतला. अन्यथा प्रकरण दुसरें मंगलाचरण ज्या सर्व स्वतंत्र भगवान् परमेश्वराच्या इच्छामात्रेकरून हे नश्वर चराचर आखिल ब्रह्मांड उत्पन्न झालें, ज्याच्या एका दृष्टिपाताने राजाचा रंक व रंकाचा राजा एका निमिषार्धात होतो, ज्याच्या आज्ञेनें हे दृश्यादृश्य भासणारे व अनंत असणारे सर्व जगत् क्षणांत उत्पन्न होतें व ज्या परमेश्वराचा संकेत होतांच तत्काळ नाश पावते, त्या सच्चिदानंद प्रभु चरणारविंदास मी सद्भावाने अभिवादन करतो. जो सर्वांचा नियंता असून सर्वत्र पूर्णत्वाने भरला आहे, 'कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् ' अशी ज्याची अतुलनीय शक्ति, हिरण्याक्षा-