पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) कल्पना तुम्हांत भरविल्या आहेत. तेव्हा या सर्व कल्पना तुम्ही दूर करा, व शांतिब्रह्म अशा अहिंसावादी धर्मास येऊन मिळा, असा उपदेश सर्वत्र हिंदुस्थानांत झाला. व त्याचा पाडाव कर- ण्याचे सामर्थ्य विशेष कोणामध्ये नसल्याने, या उभय अवैदिक मतांचा फैलाव देशांत जोराने ज्हावयास लागला. यदृच्छेनें जें होईल तें सत्य मानून स्वस्थ बसावें. वेद ही एक मानवी कल्पना आहे. प्रत्यक्षच प्रमाण मान्य. ' चक्षुर्वैसत्यं. ' प्रत्यक्ष दृष्टिपथास येईल तेच खरें, अनुमान व कल्पना सर्व ज्यर्थ आहे. मूर्तिपूजा बिलकूल करू नका, इत्यादि अवैदिक मताने भोळ्याभाबड्या व काही चांगल्या लोकांचाही बुद्धिभेदाच्या योगानें, आर्यावर्तीत एकच गोंधळ होऊन धर्मसंकर होण्याचा समय प्राप्त झाला. सनातन वैदिक धर्मातूनच फुटलेले, उलटलेले व ज्या वर्णाश्रम- धर्मात आपण जन्म घेतला, त्यास पूर्णपणे पारखे होऊन, त्या धर्मास सर्वस्वी नामशेष करण्याकरतां चंग बांधून स्वत्व विसरणारे लोक सर्वत्र ठिकाणी विजयानंदाने नाचू लागले. एक वेळ परक्या शत्रूचा प्रतिकार करणे सोपे जाईल; परंतु घरांतल्या घरांतच कल- हाग्नीने द्वेष पसरवून जिव्हारी शस्त्र घेऊन, धर्मावर उठलेले हे आपलेच, पण आतां सवतासुभा स्थापन करणारे बौद्ध जैन ताळ्यावर कसे येणार ? हा अस्तनींतील निखारा शांत कसा होणार ? या यादवीचा परिणाम अखिल आर्यावर्त अवैदिक बनण्यांत होणार की काय, अशी साधार भीती उत्पन्न झाली. बाहेरील उंटाचे पिल्लं घरांत न येऊ देणे हे एकवेळ शक्य होईल. पण घरांतच उत्पन्न झालेले, व खंबीर नेत्याच्या अभावामुळे अज्ञ लोकांकडून सक्रिय सहानुभूतीमुळे पुष्ट होणारें व स्वधर्मनाशार्थ अवतीर्ण झालेले हे उंटाचे पिल्लू, वाढत जाऊन घराचा पूर्ण विध्वंस होणार