पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमत् आद्य शंकराचार्य यांचे चरित्र प्रकरण १ लें भारत वर्षामध्ये इसवी सनापासून ज्या मोठमोठ्या धर्माच्या व राज्याच्या संस्मरणीय अशा क्रांत्या झाल्या त्या सर्व गतकालच्या इतिहासांत पाहावयास सांपडतात. परधर्मीय लोकांच्या होणाऱ्या हल्ल्यांपासून धर्माचें व देशाचे रक्षण गौतम बुद्धाच्या व जैनांच्या पूर्वी करावे लागत असे. परधर्मीय नृपतीच्या आघाताचे निवारण करावयाच्या कार्यात सर्व भारतवर्ष स्वधर्माच्या जाणीवेने एकत्र होऊन लढत असे, व तशा प्रकारचे निवारण अनेकवार झालेही. व त्या सत्वपरीक्षणाचे कायर्या आमचा आर्यावर्त अनेकवार उत्तीर्ण- ही झाला. पण बौद्ध व जैन यांच्या धर्मवादाचे निराकरण करें होणार ? सर्व प्रकारे हतबल व निष्प्रभ बनलेली भोळी जनता या पाखंडवादाने भारली गेली. यज्ञयागादिकेंकरून प्राण्यास फार यातना होतात व द्रव्यशोषही होतो. हिंसा घडल्याने आपण परमेश्वराचे अपराधी ठरतों. तेव्हां जीवाची हत्त्या करा, असा देव उपदेश कसा करील ? तर हे केवळ थोतांड आहे. बुद्धिमान व चाणाक्ष असणाऱ्या, यज्ञादि कर्मे करणाऱ्या, धूर्त श्रोत्रियांनी स्ववर्गाची महती वाढावी, आपली ज्ञानसंपन्नता कायम टिकावी, व आपल्या तंत्राने सर्व जनतेने कायमचें रहावें, एतदर्थ या सर्व