पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेस्पियरकृत--नाट्यमाला. आपल्या मित्राला देत आहेस व त्याच्यावर आपण मोठे उपकार करीत आहों, असें समजून मुळींच देऊं नको. तेव्हां तूं जें कर्ज देणार आहेस, तें प्रत्यक्ष आपल्या शत्रूला देत आहेस असें समजून दे. कारण त्याची फेड ठरल्याप्रमाणे झाली नाहीं, तर त्या अपराधाबद्दल दंडासुद्धां तुला सर्व कर्जाची भरपाई करून घेता येईल. ' त्यावर शायलॉक ह्मणतो: - ' अमळ थांबा हो, येवढे खवळलां कां ? तुमच्याशी मैत्री करावी, तुमचें प्रेम संपादावें, असा माझा दिल लागत आहे. आजपर्यंत माझी जी जी मानखंडणा आपण केली, ती सर्व विसरून जावी, सध्यांच्या प्रसंगीं तुह्माला हात द्यावा, व व्याजादाखल एका कवडीचीही इच्छा धरूं नये, असा माझा इरादा आहे. मी तर असें ह्मणत आहे. 'ऐकलें? हैं वर वर दयाळूपणाचे दिसणारें त्या यहुद्याचें बोलणें ऐकून अॅन्टोनियो याला मोठें आश्चर्य वाटलें. मग शा-- यलॉक यानें तसाच दयाळूपणाचा आव कायम ठेवून ह्मटलेंः—' मी जें हैं करतों तें सारें तुमचें प्रेम संपा- दन करावें ह्मणून; व यासाठींच मी तुझाला ही तीन हजारांची रक्कम देतों; इतकेंच नव्हे, पण मी तीवर व्याज देखील घेत नाहीं. फक्त तुझी मजबरोबर वकि- लाच्या घरापर्यंत चला, व मला आपल्या स्वतःच्या सहीनिशीं एक कागद करून द्या, ह्मणजे झालें. यांत