पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी. आमचे जातीचें ब्रीदच आहे; आठवण आहे का ? - तुझीं मला नेहमीं काय ह्मणतां ? तूं पाखंडी आहेस, गळे- कापू आहेस, कुत्र्यासारखा लघाळ आहेस, इतकें बोलूनच थांबत नाहीं, पण आणखी माझ्या पायघोळ अंगरख्यावर सपशेल थुंकतां आणि दाराशीं परकी कुत्रा आला असतां त्याला जसें लाथाळावें तसें मला तुझी लाथाळतां, नव्हे का ? ठीक आहे, आतां माझ्या मदतीची तुह्माला गरज आहे, असें दिसतें. कारण तुझी मजकडे येतां आणि मला ह्मणतां : - शायलॉक शेटजी आह्माला पैसा दे,' पण काय हो, कुत्र्याजवळ पैसे असतात का ? कुत्र्याला तीन हजारांची रक्कम देतां येईल का ?-- खरेंच सांगा, येईल का ? अथवा मी असें तरी बोलूं का — थोर गृहस्थ हो आपण गेलेच बुधवारी माझ्या अंगावर थुंकलां, अमुक अमुक दिवशीं आपण मला लाथाडलें, आणखी दुसरे एके वेळी आपण मला श्वान ह्यटलें, आणि इतक्या इतक्या प्रकारांनी आपण हा जो माझा बहुमान केला, त्याबद्दल आतां आपल्याला मी हें कर्ज देतों, ध्या.' - यावर अॅन्टोनियो संतापून ह्मणाला ः 'अरे जा, जा, आजपर्यंत जसा मी तुझ्याशीं वागत आलों तसाच यापुढें- हि वागेन, मी तुला कुत्रा झणेन, तुझ्या अंगावर थुंकेन, च लाथांनीं तुझी संभावनाही करीन, पक्के समज. जर तुझ्या मनांतून कर्ज द्यावयाचें असेल तर दे. तें तूं