पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी. ७ कांहीं मोठासा अर्थ आहे असें नाहीं. पण ही माझी एक लहर आहे, इतकेंच. त्यांत असें लिहा की, 'अमुक दिवशीं, अमुक ठिकाणी, अमुक अमुक रक्कम परत करूं, न केल्यास किंवा त्यांत चूक झाल्यास माझ्या शरीराच्या वाटेल त्या अवयवांतून एक अच्छेर मांस तुझीं कापून घ्यावें, मी हरकत करणार नाही. '

कबूल. तुह्मी

यावर अॅन्टोनियो ह्मणाला:- ह्मणतां त्या अटी लिहून माझ्या सहीनिशी करारपत्र लिहून देण्याला माझी कांहीं हरकत नाहीं. इतकेंच नव्हे, तर तुझी फार सदय आहांत असेंही मी ह्मणेन '. तेव्हां बसॅनियो मध्येंच बोलूं लागला:– 'छे, छे, मित्रा अशा करारपत्रावर माझ्या- करितां तूं खचीत सही करूं नकोस. ' तथापि अॅन्टो- नियो निक्षून ह्मणाला : - ' अरे, एवढा भितोस कां ? यावर सही करण्याला मला कांहीं हरकत वाटत नाहीं. मुदत संपली नाहीं तोंच, माझीं गलबतें कर्जाऊ रक- मेच्या किती तरी अधिक किमतीच्या मालानें भरलेलीं येऊन पोहोचतील. ' हीं यांची भाषणे ऐकून शायलॉक मोठ्यानें हांसून ह्मणाला ः ' अरे अरे अरे हे ख्रिस्ती लोक कोण तरी विचित्र आहेत पहा! हे स्वतःचे व्यव - _हारांत दुष्ट, आणि ह्मणूनच हे इतरांविषयीं येवढी शंका घेतात.' असें ह्मणून, तो बसॅनियो याजकडे वळून