पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ शेस्पियरकृत - नाट्यमाला. तेवढ्या व्याजासहित करून देईन.' हे ऐकून, शाय- लॉक आपल्या मनांत ह्मणाला :-'एकदा जर कां ही स्वारी माझ्या तावडींत सांपडेल तर कसें पण मी मागचें उहें काढीन. अरे, आमच्या पुराण्या पवित्र जातीची निंदा करतोस, नाहीं ? भर बाजारांत ज्या ठिकाणीं व्यापारी लोक जमायाचे त्या ठिकाणीं सर्वांसमक्ष आमची अब्रू घेतोस, नाहीं ? आमच्या व्यवहाराची टर उडवतोस, नाहीं ? आह्मी मेहनत करून कष्टानें पैसा मिळवितों त्याला ' व्याज, व्याज ' ह्मणून आमच्या नांवानें खडे फोडून आमची निंदा करतोस, नाहीं ? जर मी याला या वेळीं क्षमा केली, तर धिःकार असो माझ्या जातीस!' शायलॉक हा कांहीं उत्तर देत नाहीं, पण मनांतले मनांत कांहीं विचार करीत आहे, असें पाहून अॅन्टो- नियो यानें त्याला हांक मारून झटले: - 'कायरे बाबा, मी काय ह्मणतों ऐकलेंस ? मला पाहिजे आहे तेवढी रक्कम कर्जाऊ देतोस का ? ' रा- यावर शायलॉकनें उत्तर केलें:- जश्री, सराफकट्यांत आपली गांठ पडली असतां आपण माझ्या व्याजबट्ट्याबद्दल व माझ्या पैक्याबद्दल किती वेळां बरें निंदा केली आहे ? पण याबद्दल मी तुह्माला कधीं कांहीं बोललो तरी ? आपण जें जें बोललां तें सर्व निमूटपणें सोसून घेतलें आणि जाऊं द्या, असें ह्मणून स्वस्थ बसलों. कारण, सहनशीलत्व हैं