पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी. आणि प्रत्यक्ष तोंडाने जरी उच्चार केला नाहीं, तरी नेत्रकटाक्षांनीं मला प्रेमसूचक बहुत निरोप पाठविले आहेत. या चिन्हांवरून मला तर बुवा वाटतें कीं, जर तिच्याशी लग्नाचें बोलणें काढलें, तर बहुदा माझा अव्हेर होणार नाहीं. परंतु करावें काय! अशा मोठ्या श्रीमंत स्त्रीशी जो कोणी लग्नाची गोष्ट बोलण्यास तयार होईल त्याला जो इतमाम असावा तो बाळगण्याचें माझे आंगीं सामर्थ्य कोठे आहे ? ' असें ह्मणून अॅन्टो- नियो यानें जशी अनेक वेळां यापूर्वी पैसे देण्याची कृपा केली होती तशी आणखी एकवार करून तीन हजारांची रक्कम देणेंविषयीं बसॅनियो यानें त्याची प्रार्थना केली. 1. अॅन्टोनियो याजपाशीं या वेळीं देण्याला पैसा नव्हता; परंतु मालानें भरलेलीं कांहीं गलबतें लवकरच बंदरांत यावयाचीं होतीं. हे लक्षांत आणून तो म्हणाला:- चिंता नाहीं, आपण त्या धनाढ्य यहूदी सावकाराकडे जाऊ आणि या माझ्या गलबतांच्या भरवशावर कर्जाऊ पैसा घेऊ. ' मग अॅन्टोनियो व बसैनियो हे दोघे शायलॉक यहूद्याच्या घरी गेले आणि अॅन्टोनियो यानें त्याजपाशीं तीन हजारांची रक्कम कर्जाऊ मागितली आणि ह्मणाला :- ' माझीं जीं गलबतें दूरदेशांहून यायचीं आहेत, तीं आलीं कीं त्यांतील मालानें तुमच्या पैशाची फेड, तुह्मी मागाल