पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. द्रव्यासंबंधानें अॅन्टोनियो याची स्थितीहि कांहीं वा- ईट नव्हती व परोपकार करण्यांत तो नेहमी तत्पर असे. सारांश याचीं कृत्यें पाहून, औदार्याविषयीं व थोरपणा- विषयीं प्राचीन रोमन लोकांची जी ख्याती होती तिची आठवण झाल्यावांचून रहात नसे. त्या वेळीं असें मनुष्य सर्व इटली देशांत पाहूं जातां, क्वचितच सांपडलें असतें. व्हेनिसनगरचे सर्व लहान थोर लोक त्याजवर प्रेम करीत असत. तथापि बर्सेनियो ह्मणून त्याचा एक जिवश्चकंठश्च मित्र होता, त्याचें प्रेम विशेष होतें. त्याचे बापानें त्याला मालमत्ता फारच थोडी ठेवली होती. आणि जी होती ती त्याने खर्चीकपणाने वागून सारी उधळून टाकली होती. तथापि अॅन्टोनियो व बर्सेनियो यांचा मित्रत्वानें जसा एक जीव होता, तशी दोघांची पेटीहि एकच होती; यामुळे त्याला पैशाची उणीव भासत नसे. एके दिवशीं, बसैनियो हा उठून अॅन्टोनियो याजकडे आला आणि ह्मणूं लागलाः-- मित्रा थाटानें एक लग्नाचा बार उडवून द्यावा व माझी गेलेली संपत्ति पुन्हां घर-येती करावी असा घाट मीं घातला आहे. माझे एका धनिक स्त्रीवर प्रेम जडलें आहे. तिच्या 'बापानें तिला पुष्कळ मालभिळकत ठेविली आहे, व 'त्या सर्वाची ती एकटीच मालकीण आहे. या स्त्रीनें अनेक वेळां प्रेमप्रेरित दृष्टीनें मजकडे पाहिलें आहे.