पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी या नाटकाचें संविधानक. शायलॉक या नांवाचा कोणी यहूदी व्हेनिस- नगरी राहत असे. तो सावकारी करून ख्रिस्ती व्यापा-यांस भारी दराने पैसे व्याजी देत असे. अशा रीतीनें त्यानें अतोनात पैसा मिळविला होता. त्याचा स्वभाव खाष्ट होता, आणि व्याजी दिलेल्या पैशाचा वसूल करण्यांत त्याला कोणाची दयामाया येत नसे. यामुळे त्या शहरांतील सर्व भमाणसांना तो आवडत नसे, विशेषेकरून व्हेनिसनगरचा एक तरुण व्यापारी, अॅन्टोनियो, याचा च त्याचा याच कारणावरून उभा दावा पडला होता. अॅन्टोनियो हा संकटांत सांपडलेल्या लोकांना पैसे देत असे व त्याबद्दल कोणापासून कधीं कवडी देखील व्याज घेत नसे. एकंदरीनें पाहतां, अॅन्टोनियो याच्यासारखें दया मनुष्य फारच थोडें.