पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० शेस्पियरकृत-नाट्यमाला त्याचें यथार्थ स्वरूप दाखविण्याचे यश घेतो हें पहाणे आह. वरील दोन्ही नाटकांतील साम्य केवळ रेखामातेंकरून येथें दर्श विलें आहे. इतर अडचणीप्रमाणेच छापण्याच्या जबरदस्त गैरसो- ईस्तव याहून अधिक कांहीं करतां येत नाहीं, म्हणून तूर्त येथेच थांबतों, असं दुःखाने येथे कळविल्याखेरीज राहवत नाहीं. मृच्छकटिक नाटकाच्या तुलनेचा विषय वांचकांपुढे असतां - नाच, ह्यासंबंधाची एक सूचना उपसंहारादाखल करून, हा उपा द्धात आम्हीं पुरा करितों. शेकूस्पिअर कवीचीं नाटके वाचावयाची ती केवळ मौजेकरितांच असू नयेत; त्यांच्या वाचनाबरोबरच अभ्यास आणि मनन यांचीहि जोड ठेवणें अवश्य आहे, असें आमचें मत झालें आहे यास्तव ही गोष्ट आमच्या वाचकांच्या लक्षांत आणून देणें फार अगत्याचे आहे असे आम्ही समजतो. नाट्यकला आपल्या इकडे प्राचीन काळापासून प्रचारांत आहे व तो बन्याच उर्जितावस्थेस एकेकाळी येऊन पोहचली होती, यांत शंका नाहीं. तेव्हां आपल्या इकडील संस्कृत नाटयग्रंथाशीं शेक- स्पिअर कविच्या नाटकांची तुलना जेथें जेथें करून दाखवितां येईल तेथे तेथे करून दाखवावी, निदान अशा तुलनेकडे वाच - कांचें लक्ष वेधावें असें आम्हीं योजिलें आहे. तरी ही योजना त्यांस पसंत पडेल, व अशा अभ्यासास व मननास बरीच मदत होईल अशी आशा आहे. कळविण्यास संतोष वाटतो कीं, आमचा नाट्यमालेचा उद्योग आपले सध्याचे लोकप्रिय गव्हनरसाद्देव नेक नामदार सर जार्ज सिडेनम क्लार्क ह्यांस पसंत पडला असून त्यांचे खासगी कारभारी ह्या संबंधानें कळवितात की, " नाट्यमालेला प हिले वर्गाचे वर्गणीदार व आश्रयदाते ( पेटून ) होण्याची नेक नामदारांची मर्जी आहे; ह्या कामी आपणांस पूर्ण- यश प्राप्त होवो असेही ते इच्छितात. " ह्या कृपाप्रसादाबद्दल आम्ही नेक नामदारांचे फार फार आभारी आहों. प्रस्तुत लेख पुरा करण्यापूर्वी आमचे जुनें मित्र राज श्री दामोदर रामचंद्र चिपळुणकर बी. ए. त्यांचे स्मरण वाचकांस देण्याचें सांप्रत अगत्य आहे. हे शेकूस्पिअर कवींचे एक भक्त असून बाणेदार मराठी लेखक आहेत. ह्यांचे साहाय्य आम्हांस चांगलें आहे, ह्या गोष्टीचा आम्हांस मोठा अभिमान वाटतो. समाप्त.