पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८९ शूद्रक कवीला प्रौढ नायिका नाटकांत पाहिजे होती, पण आपले देशांत बालविवाहामुळे व स्त्रियांच्या पडदपोशीमुळे त्याची इच्छा पूर्ण होण्याला कांहीं मार्ग त्याला दिसला नाहीं; यास्तव त्याने एकदम गणिकेच्या मुलांकडे धाव मारली असे आम्हांस वाटतें. तथापि पोशियेच्या आंगी असलेले प्रौढपणा, विनयसंपन्नता व श्रीमंती हे गुण वसंतसेनेच्या ठिकाणी शुद्ध कवीने आणण्याचा यत्न केला आहे, असे म्हणावयास कांहीं चिंता नाही. " मृच्छकटिकांतले शर्विलक हें पात्र बरेंच शिक्षणसंपन्न व खट- पटी दिसतें. शर्विलक हा राज्यप्रकरणों उलथापालथींत पडलेला असून, कांहीं निमित्तानें चोरी करण्यास सिद्ध झालेला आरण पाहतों. पण तो मुळचा चोर होता असे दिसत नाहीं. चोरी करतांना तो शास्त्रांतली म्हणून जी वचने बोलून दाखवितो तीं हास्यरस उत्पन्न करण्याचे कार्य उत्कृष्ट रीतीनें करितात. याव रून तो फाजोल सभ्यपणाची टर उडवणाच्या बहुभाष मॅशियानो या पात्राची जणो बरोबरी करीत आहे असे कोणास वाटणार नाही ? या पात्राची भाषणे वाचून व त्यांचं चार पाहून हा केवळ चोर आहे; अर्थात् निंद्य आहे असे दाखविण्याचा कवीचा बेत असावा असें वरवर विचार करणास वाटेल. परंतु या पात्राविषयी आमची समजून वेगळी झाली आहे. आंतून निय कर्मे करून बाहेरून शास्त्रोक्त वचनें बोलून दाखविणान्या व धार्मिकपणाचा डौल घालणाऱ्या दांभिक पंडितांची टर उडवि ण्याचा कवीचा हेतु असावा असें दिसतें. शकार दें पाचही हास्य- रस उत्पन्न करणारे आहे. व त्याची तुलना व्हेनिस नगरचा व्यापारी या नाटकांतील 'दीर्घ शकारा'शी म्हणजे शायलॉक या पात्राशी केली असतां चालेल. शायलॉक में पात्रहां कवीने हास्यरस उत्पन्न करण्याकरितांच आणिले आहे. अशी सामान्यतः एकेकाळी समजूत होती. हें मार्गे सांगितलेच आहे. तीत जसा अलीकडे फरक पडला आहे तसाच शर्विलक व शकार यांच्या भाषणांत, अभिनयांत व एकंदर आवर्भावांत फरक पडण्याची अवश्यकता आहे असे आम्हांस वाट शकार हा कांही मूळचा मूर्ख किंवा भोळा दिसत नाहीं. त्याचे चार कांहीं अधिकारांच्या घमेंडीचे व कांहीं मतलबाचे स्पष्टपणे दिसतात. वस्तुतः मूर्ख- पणा हे आपल्या वाड्या जिरविण्याकरितां त्याचें डींग होते. यास्तव त्याच्या हृदयाचा ठाव घेऊन आपले इकडील कोण नट